धक्कादायक माहिती, राज्यातील 'या' जिल्ह्यात वर्षभरात 516 जणांचा कोरोनाने मृत्यू

धक्कादायक माहिती, राज्यातील 'या' जिल्ह्यात वर्षभरात 516 जणांचा कोरोनाने मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यातच कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाला होता.

  • Share this:

अकोला, 12 एप्रिल : अकोला (Akola) जिल्ह्यात गेल्यावर्षी 7 एप्रिलला कोरोनाचा (Corona) शिरकाव झाला होता. तर गेल्यावर्षी 11 एप्रिल पासून मृत्यूचं सत्र सुरू झालं होतं. त्यावर अजूनही नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. वर्षभरात आता मृतकांचा आकडा 516 वर येऊन पोहोचला आहे. आणि गेल्या 12 दिवसात कोरोनाचे 61 बळी गेले आहेत. आता मार्चनंतर अकोलेकरांसाठी एप्रिल महिनासुद्धा घातक ठरत आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यातच कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाला होता. नंतर महिनाभरात तिघांचा मृत्यू झाला होता. यानंतर मृत्यूचा हा आलेख वाढतच गेला. गेल्यावर्षी सर्वाधिक मृत्यची नोंद सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात तब्बल 84 मृत्यू झाले होते. त्यामुळे अकोलेकरांमध्ये दहशतीचे वातावरण होते. यानंतर रुग्णसंख्येच्या वाढीसोबत मृत्युदराच्या प्रमाणात अंकुश लावण्यात  विभागाला यश आलं होतं. त्यामुळे लोकांमध्ये कोरोना महामारीविषयी भीती कमी होत गेली.

Maharashtra Lockdown घोषणेआधी पश्चिम रेल्वेकडून स्पेशल रेल्वे गाड्यांची घोषणा

दिवाळी या सणानंतरही परिस्तिथी काही प्रमाणात नियंत्रणात आली होती. मात्र बाजारपेठा, लग्नसराईमध्ये नागरिकांकडून झालेल्या बेफिकीरीमुळे कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले. नव्या वर्षात पुन्हा रुग्णसंख्या वाढीला सुरुवात झाली. फेब्रुवारी 2021 पासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली, ती अजूनही कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक 83 रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र एप्रिल महिन्यात हा वेग  दुप्पट वाढल्याचं दिसत आहे.

Maharashtra Lock down : लॉकडाऊनची नियमावली ठरली, लोकलबाबत महत्त्वाची माहितीसमोर

गेल्या 12 दिवसांत 61 मृत्यू झाल्याने अकोल्यातील कोरोनाची परिस्तिथी गंभीर झाली आहे. कोरोना संदर्भात नागरिकांमध्ये संवेदनशिलता असती तर,  जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कदाचित कोरोनाचा कहर वाढला नसता, बाजारपेठांमध्ये उसळलेली गर्दी, आरोग्य विभागाच्या नियमांची पायमल्ली यावरून अकोलेकर संवेदन शून्य झालेले दिसताये. कोरोनाच्या वाढत्या लाटेत प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून नियमांचं काटेकोर पालन केलं असतं तर हा उद्रेक काही प्रमाणात तरी टाळू शकले असते, आणि कोरोनाने गावलेले जीव वाचवू शकले असते.

Published by: sachin Salve
First published: April 12, 2021, 11:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या