मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'नजर हटी..' दागिने गायब, काही सेंकदात महिलेनं गंठण केलं लंपास, LIVE VIDEO

'नजर हटी..' दागिने गायब, काही सेंकदात महिलेनं गंठण केलं लंपास, LIVE VIDEO

नेमकी याच संधीचा फायदा घेऊन हातचलाखीने या महिलेनं 75 हजार रुपयांचे गंठण आपल्या कपड्यांमध्ये लपवले आणि दुकानातून निघून गेली.

हिंगोली, 17 ऑक्टोबर : सराफाच्या दुकानात (jewelers shop) चोरीच्या घटना वारंवार वाढतच चालल्या आहे. हिंगोलीमध्ये  (hingoli) एका सराफा व्यापाराच्या दुकानातून तब्बल 75 हजार रुपयांचे गंठण (ganthan ) बुरखाधारी महिलेने लंपास केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकारचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हिंगोली शहरातील नागनाथ आप्पा सराफ ज्वेलर्स या दुकानामध्ये ही घटना घडली आहे.  शहरातील सराफा बाजार भागात असलेल्या नागनाथ अप्पा सराफ ज्वेलर्स दुकानात 15 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास एक बुरखाधारी महिला आली होती. ही महिला दागिने खरेदी करण्यासाठी आली होती. त्यावेळी तिने कर्मचाऱ्यांना वेगवेगळे दागिने दाखवण्यास सांगितले. दागिने पाहत असताना ही महिला कर्मचाऱ्याला वेगवेगळ्या दागिन्यांची मागणी करत होती. त्यामुळे काऊंटरवर काही दागिने हे ठेवलेली होती. चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? या उपायांनी मिळवा परत नेमकी याच संधीचा फायदा घेऊन हातचलाखीने या महिलेनं 75 हजार रुपयांचे गंठण आपल्या कपड्यांमध्ये लपवले आणि दुकानातून निघून गेली. VIDEO : मलायकाचा एअरपोर्ट लुक व्हायरल; प्रिटेंड ड्रेसमध्ये दिसत होती ग्लॅमरस महिला गेल्यानंतर एक गंठण कमी असल्याचा प्रकार कर्मचाऱ्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सीसीटीवी फुटेज तपासले आणि त्यामध्ये सदर महिला चोरी करत असल्याचं दिसून आला आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या महिलेचा शोध पोलीस घेत आहेत.
First published:

पुढील बातम्या