मुंबई-गोवा महामार्गासाठी वृक्षतोड झाली पण 10 वर्षांत एकही वृक्ष लावले नाही!

मुंबई-गोवा महामार्गासाठी वृक्षतोड झाली पण 10 वर्षांत एकही वृक्ष लावले नाही!

मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66च्या पहिल्या पळस्पे ते इंदापूर या चौपदरीकरणाच्या टप्प्यातील सुमारे 10 हजारांहून अधिक झाडांची बिनदिक्कितपणे तोड करण्यात आली आहे.

  • Share this:

शैलेश पालकर, प्रतिनिधी

रायगड, 09 डिसेंबर : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चे चौपदरीकरण करण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील 697 वृक्षतोडीचे लार्सन ऍण्ड टूब्रो कंपनीकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. या कंपनीवर सुमारे 10 हजार वृक्ष लागवडीसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66च्या पहिल्या पळस्पे ते इंदापूर या चौपदरीकरणाच्या टप्प्यातील सुमारे 10 हजारांहून अधिक झाडांची बिनदिक्कितपणे तोड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या 10 वर्षांमध्ये एकही झाड लावण्यात आले नसल्याने कोणत्याही यंत्रणेला 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' असे संतवचन असुनही वृक्ष लागवडीशी सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

पहिल्या टप्प्याचे पळस्पे पनवेल ते माणगांव इंदापूरपर्यंतचे काम गेली. दहा वर्ष सुरू असून ते पूर्णत्वास गेले नसले तरी या पहिल्या टप्प्यातील सुमारे 10 हजारांहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या कामातील कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि सुकेळीखिंड भागात वृक्षतोडीचे प्रमाण सर्वाधिक होते.

इंदापूर ते चिपळूण दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील महाड तालुक्यातील वीर ते पोलादपूर तालुक्यातील भोगावपर्यंतच्या मधल्या टप्प्याचे चौपदरीकरण करण्यासाठी लार्सन ऍण्ड टूब्रो कंपनीला ठेका देण्यात आला आहे. या मधल्या टप्प्यामध्ये 2 हजार 817 एवढ्या पूर्ण विकसित झाडांची कत्तल केली जाणार आहे. अर्थातच, लार्सन ऍण्ड टूब्रो कंपनीला यासाठी 10 हजार झाडांची लागवड करण्याचे काम सोपविण्यात आले आहे.

यापैकी वनविभागाच्या महाड गटामध्ये 1 हजार 49 तर पोलादपूर गटामध्ये 697 पूर्ण विकसित झाडांची संख्या असल्याचे निश्चित करण्यात आले. ही संख्या केवळ सामाजिक वनीकरण विभागामार्फत लागवड करून वनविभागाकडे वर्ग करण्यात आलेल्या झाडांची आहे.  खासगी मालकी झाडांचा मोबदला मूळ मालकांना देण्यात येऊन या झाडांची कत्तल करण्यास वनविभागाची अनूकूलता प्राप्त झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

इतर बातम्या - स्मशानभूमीतच घेतला गळफास, चिठ्ठीत लिहलं धक्कादायक कारण...

याबाबत, वनसंवर्धन व वनरक्षणाची जबाबदारी असलेल्या वनविभागाला मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 बाबत पूर्णत: विपरित असे वृक्षतोडीची परवानगी देण्याचे धोरण राबवावे लागत आहे. महाड वनविभागामार्फत महाड तालुक्यातील वीर ते पोलादपूर तालुक्यातील भोगाव या सुमारे 40 कि.मी. अंतराच्या या लार्सन ऍण्ड टूब्रो कंपनीला मिळालेल्या ठेक्यामध्ये केवळ 10 हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले. रस्त्याच्या दूतर्फा 5 हजार आणि रस्ता दुभाजकावर 5 हजार वृक्षांची लागवड करण्याचे धोरण एल ऍण्ड टी कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. यानंतर दूतर्फा 5 हजार झाडे लावली तर दोन्ही बाजूला प्रत्येकी 2 हजार 500 झाडे लावली जातील असे असताना मधोमध असलेल्या रस्ता दुभाजकावर 5 हजार झाडे लावण्याचे लावण्याचे प्रमाण अनाकलनीय असल्याचे दिसून येत आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 रस्ता चौपदरीकरणादरम्यान सुमारे 10 हजारांहून पूर्ण विकसित झाडांची कत्तल करण्यात आल्याच्या घटनेला सुमारे 8-10 वर्षांचा कालावधी लोटला असताना अद्याप एकही झाड लावल्याची माहिती अधिकृतपणे संबंधित ठेकेदारांकडून देण्यात आली नाही. अथवा तशाप्रकारे कोणतेही वृक्षारोपण झाल्याचे या पहिल्या टप्प्यामध्ये दिसून आले नाही.

इतर बातम्या - पत्नी ओरडत होती 'प्लीज कोणीतरी वाचवा' लोक VIDEOमध्ये दंग, पतीने कुशीतच सोडला जीव

या परिस्थितीत दुसऱ्या टप्प्यात अंधाधुंद प्रकारे वृक्षतोड करण्यात येत असून केवळ पाच मिनीटांमध्ये तोडून कोसळलेल्या झाडांच्या फांद्या आणि खोडांची विल्हेवाट लावण्यात येत असताना वनविभागाकडून देण्यात आलेल्या माहितीचा प्रत्यक्षात कशाप्रकारे वृक्षलागवडीसाठी प्रयत्न केले जातील, याबाबत साशंकता आहे.

त्यामुळे ब्रिटीशकालीन मुंबई ते गोवा महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर झाल्याला आता 65 वर्षे लोटली असून सुमारे शंभराहून अधिक वर्षे वयाच्या वृक्षांची तोड मोठया संख्येने होत असताना केवळ 10 हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट लार्सन ऍण्ड टूब्रो कंपनीला देण्यात येणे कार्बनक्रेडीटच्या समीकरणात अत्यल्प असल्याचे स्पष्ट करीत आहे.

इतर बातम्या - हैदराबादप्रमाणे आरोपीचा एन्काऊंटर करा, बलात्कार, हत्येनंतर नागपूर तापलं

वृक्षतोडीचे लोण पोलादपूर शहरामध्ये पोहोचल्यानंतर मोठमोठे वृक्ष तोडले जावून मोठया आकारमानाच्या फांद्या आणि खोडांची वाहतूक केली जात असून उरलेल्या फांद्यांवर जळणासाठी लाकूडफाटा या सबबीवर स्थानिकांचा गराडा पडत आहे. नव्याने वृक्षलागवड व संगोपन तसेच संवर्धन होईपर्यंत कार्बन क्रेडीटचा विचार बाजूला सारून वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण जळणासाठी वापरल्या जाणाऱ्या फांद्यामुळे वाढणार आहे.

इतर बातम्या - महाराष्ट्रात आणखी एक बलात्काराची घटना, अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2019 02:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading