औरंगाबाद, 16 नोव्हेंबर : औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज एका गोदामावर छापा मारला. या गोदामामध्ये जेव्हा जलील पोहोचले, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.
शहरातील वाळूज परिसरात असलेल्या या गोदाममध्ये गहू आणि तांदूळ यांची अफरातफर होत असल्याचा आरोप जलील यांनी केला. स्वस्त धान्य दुकानावर वाटण्यात येणारा 2 रुपये किलोचा गहू या गोदाममध्ये दळून त्याचे पीठ 25 ते 30 किलोने बाजारात विकले जात होते, असा आरोप जलील यांनी केला.
खासदार जलील ज्या वेळी या गोदमावर पोहचले त्या वेळी गोदामातील कर्मचारी पळून गेले. पोलिसांनी गोदामामध्ये असलेल्या धान्याचा आता पंचनामा सुरू केला आहे.
सरकारी धान्याच्या पोत्यावरील लेबल काढून ते दुसऱ्या पोत्यात घालून बाजारात विकणारी मोठी टोळी असावी ज्यामध्ये वरपर्यंत पोलीसअधिकारी आणि पुरवठा विभागाचे अधिकारी सामील असून उच्च स्तरीय चौकशीची मागणी खासदार जलील यांनी केली.
==============================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा