मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण हालचाली, नवी दिल्लीत वकिलांची बैठक

मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण हालचाली, नवी दिल्लीत वकिलांची बैठक

मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.

मुंबई, 10 जानेवारी : सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.

नवीन महाराष्ट्र सदनमध्ये सोमवारी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अनिल परब यांच्यासह राज्य शासनाने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ, शासकीय तसेच खासगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत.

मराठा समाज व शासकीय वकिलांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या 5 खासगी वकिलांच्या समितीचे सदस्यदेखील या बैठकीत ऑनलाइन सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते. त्यानुसार राज्य सरकार आपल्या रणनीतीवर अंतिम हात फिरवत असून, आजवर झालेल्या तयारीची समीक्षा केली जाते आहे.

दरम्यान, आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून राज्य सरकारवरही टीकेचे आसूड ओढले गेले. तसंच मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी होणाऱ्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, हे पाहावं लागेल.

First published:

Tags: Maratha reservation, मराठा आरक्षण maratha aarakshan