माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे

संघप्रथेप्रमाणे प्रमुख अतिथीचं भाषण आधी होत असते पण यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणवदांच्या आधी भाषण केलं. त्यानंतर प्रणव मुखर्जी यांच्या भाषणाला सुरूवात झाली.

  • Share this:

नागपूर, 07 जून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला. संघप्रथेप्रमाणे प्रमुख अतिथीचं भाषण आधी होत असते पण यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणवदांच्या आधी भाषण केलं. त्यानंतर प्रणव मुखर्जी यांच्या भाषणाला सुरूवात झाली. प्रणव मुखर्जी यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. जाणून घेऊयात त्यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे...

- भारताचा गौरवशाली इतिहास हा शैक्षणिक आणि ज्ञानाचा खजिना आहे

- मी राष्ट्रवाद, देशहित आणि भारताचेच संदर्भात बोलणार

- चाणक्यानं जगाला अर्थशास्त्र शिकवलं, भारत स्वतंत्र विचाराची भूमी

- 1800 वर्षांपूर्वी भारत शिक्षणाचं केंद्र, भारताचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले

- 600 वर्षांची मोगलांची सत्ता एका ब्रिटिश कंपनीने संपवली, अनेक राजवटी आल्या पण भारताची ओळख कायम राहिली

- कोणत्याही एका वर्गाचं वर्चस्व ही सगळ्या समाजाची ओळख असू शकत नाही

- 2500 हल्यांच्या वर्षांच्या इतिहासात 5000 हजार वर्षांची संस्कृती या देशात कायम राहिली

- गांधी आणि नेहरू यांनी सर्व धर्म समभावातूनच राष्ट्रप्रेमाचे धडे दिले

- भारत एक धर्म, एका भाषेचा देश नाही. राष्ट्रवाद जाती, धर्म, भाषेपेक्षा उंच आहे

- जसे गांधींनी भारतीय राष्ट्रवाद शिकवला तो आक्रमक आणि विनाशकारी नव्हता

- भारताची आत्मा सहिष्णुतेतच आहे. वेगळा रंग, भाषा, वेगळी ओळख आहे.

- हिंदू, मुस्लिम, शिख, इसाईमुळे भारत एक आहे

First published: June 7, 2018, 9:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading