Good Morning : आजच्या या आहेत 5 महत्त्वाच्या बातम्या, तुम्ही लक्ष ठेवलंच पाहिजे!

Good Morning : आजच्या या आहेत  5 महत्त्वाच्या बातम्या, तुम्ही लक्ष ठेवलंच पाहिजे!

  • Share this:

  • मराठा आरक्षण : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालावरचा एटीआर सरकार आज मांडणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हा कृती अहवाल मांडण्यात येईल. सकाळी मंत्रिगटाची बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
  • मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल मिळावा यासाठी काही मराठा संघटनांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सरकार हा अहवाल विधिमंडळातच ठेवायला तयार नाही. त्यामुळं न्यायालय काय भूमिका घेते हे महत्वाचं ठरणार आहे.
  • कृषी उत्रन्न बाजार समितीचं नियंत्रण दूर झाल्यानं आता माथाडी कामगारांनी बेमुदत संपाची हाक दिलीय. या विविध संघटना सहभागी होणार आहेत. हा संप चिघळला तर त्याचा मालवाहतूकीवर परिणाम होऊ शकतो.
  • मध्यप्रदेश आणि मिझोराम मध्ये आज विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. मतदान झाल्यानंतर शिवराजसिंग चौैहान यांचं भविष्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. भाजपने आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. 11 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
  • करतारपूर कॉरिडॉरचं आज उद्घाटन होणार आहे. पकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे या कॉरिडॉरचं उद्घाटन करतील. पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिध्दू हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कॉरिडॉरमुळं पाकिस्तानातल्या पंजाबमधल्या करतारपूर साहेब या पवित्र गुरूव्दाराच्या दर्शनासाठी शीख भाविकांना जाता येईल. भारत आपल्या बाजूने तर पकिस्ता आपल्या भागात यासाठी मोठा रस्ता तयार करणार आहे.

First published: November 27, 2018, 11:56 PM IST

ताज्या बातम्या