महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान, या आहेत महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान, या आहेत महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचं आज मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातल्या 17 जागांचा समावेश असेल. यात मुंबईतल्या सर्व जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या मतदानाचा हा शेवटचा टप्पा आहे.

या तिसऱ्या टप्प्यात देशात 9 राज्यांमध्य एकूण 72 जागांसाठी मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 943 उमेदवार रिंगणात आहेत.

राज्यात उष्णतेची लाट असून चंद्रपूर अकोला आणि जालना जिल्ह्यात तापमान 47 वर पोहोचलं आहे. काही दिवस ही लाट अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान खात्याने केलंय.

'चौकीदार चोर है' या वक्तव्यावर राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टाने अवमानना नोटीस दिली आहे. त्याच्यावर कोर्टात सुनावणी सुरू असून सोमवारी राहुल गांधी हे त्या नोटीसीला उत्तर देणार आहेत. प्रचारात 'चौकीदार चोर है' या शब्दांचा वापर करताना तसं सुप्रीम कोर्टानेच म्हटलं आहे असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यावरून त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली होती.

चौथ्या टप्प्यानंतर आता पाचव्या टप्प्यातल्या प्रचाराला आणखी जोमाने सुरुवात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी हे सभांचा धडाका लावणार आहेत. 6 मेरोजी सात राज्यांमध्ये 51 जागांसाठी मतदान होणार आहे.

 

First published: April 28, 2019, 11:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading