Home /News /maharashtra /

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वाची बातमी, फायदा मिळण्यासाठी 22 दिवस पाहावी लागणार वाट

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वाची बातमी, फायदा मिळण्यासाठी 22 दिवस पाहावी लागणार वाट

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यासाठी अजून 22 दिवस तरी लागणार आहेत.

नाशिक, 1 जानेवारी : केंद्र सरकारनं कांद्याची निर्यातबंदी 1 जानेवारीपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि कांदा भावातील पडझड लगेल नियंत्रणात आली. तरीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यासाठी अजून 22 दिवस तरी लागणार आहेत. देशातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्यात रांगडा अर्थात नवीन लाल कांदा यायला अजून काही दिवस लागणार आहेत. आपल्या देशानं घेतलेल्या या निर्णयामुळे बिचकलेल्या पाकिस्तान आणि तुर्कस्तान या देशांनी तत्काळ आपला कांदा एक्स्पोर्ट दर कमी केला असला तरी याचा कोणताही परिणाम भारतीय कांद्यावर होणार नाही असा विश्वास शेतकरी आणी व्यापारी या दोघांनाही आहे. अवघ्या 8 दिवसात हे चित्र झपाट्यानं बदलणार असलं तरी सरकारनं पुन्हा निर्यातबंदी करू नये ही शेतकऱ्यांची मागणी कायम आहे. कसे आहेत कांद्याचे भाव आणि बाजारातील स्थिती? कांद्याला सध्या 2200 ते 2800 प्रती क्विंटल भाव असून सरासरी 2400 रुपये भाव आहे. रांगडा अर्थात चार पदरी लाल कांदा दाखल होत आहे. हा कांदा एक्स्पोर्टसाठी सर्वोत्तम मानला जातो. जगातील 30 देशात या कांद्याची निर्यात होते. मलेशिया,श्रीलंका,सिंगापूर,लंडन,दुबई,अमेरिका, स्वीडन,जकार्ता,बांगलादेश, गल्फ कंट्री,नेपाळ या देशाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. भारतासह जगात पाकिस्तान,चीन,तुर्कस्तान,कझाकिस्तान या देशांमधील कांदाही मोठ्या प्रमाणात विकला जातो. भारतातील निर्यातबंदी रद्द होताच पाकिस्तान आणी तुर्कस्तानमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या देशांकडून कांदा एक्स्पोर्टचे भाव पाडण्यात आले आहेत. दरम्यान, खाण्यासाठी आणि चवीसाठी भारतीय कांदा जगात सर्वोत्तम मानला जातो.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Farmer, Nashik

पुढील बातम्या