Home /News /maharashtra /

CAA आणि NRC बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महत्त्वाचा खुलासा

CAA आणि NRC बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महत्त्वाचा खुलासा

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी राज्य सरकारच्या कामकाजाबद्दल माहिती दिली.

पुणे, 27 जानेवारी : देशभरात एनआरसी NRC आणि सीएए CAA कायद्यावरून आंदोलनं सुरू आहे. महाविकासआघाडी सरकारनेही कायदा लागू करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एनआरसीबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी राज्य सरकारच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. यावेळी, 'महाराष्ट्रामध्ये  एनआरसी लागू करायचा की नाही त्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील.  पण आमची भूमिका एकच आहे. महाराष्ट्रात कुणालाही एनआरसी, सीएएचा त्रास होऊ देणार नाही असं सगळ्यांचं मत आहे', अशी महत्त्वाची माहिती अजित पवारांनी दिला. तसंच, आधीपासून सुरू असलेल्या महत्त्वाच्या योजना सुरू ठेवणार आहे. राज्यावर आधीच कर्जाचा बोजा आहे. आणखी कर्ज काढता येऊ शकतं का? त्याचा तपास करणार आहे. केंद्राच्या बजेटनुसार किती पैसे येतात ते पहाव लागेल, असंही अजित पवार म्हणाले. भीमा कोरेगाव प्रकरणी केंद्र सरकारने एनआयएकडे तपास सोपोवला आहे. या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भूमिका मांडली आहे, असंही अजित पवार म्हणाले. CAA आणि NRCवरून शरद पवारांची टीका दरम्यान, मागील आठवड्यात शरद पवार यांनी पुन्हा एकदा CAA आणि NRC वरून आपली भूमिका स्पष्ट केली होती. 'जनगणनेत प्रत्येकाच्या जन्माची नोंद करण्याचा निर्णय होत आहे. जन्म झालेल्या गावाची देखील नोंद होईल असे पाहण्यात येत आहे. पण जो भटका समाज आहे त्याच्या जन्माची कोणती नोंद असेल का? त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल का? नाहीतर त्याच्यावर अन्याय होणार आहे,' असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारने आणलेल्या CAA आणि NRC कायद्यावर जोरदार टीका केली. 'समाजातील अनेक गोष्टींचा परिणाम सामाजिक न्याय विभागात असलेल्या घटकांना बसतो. यासाठी आपण जागरूक राहावे लागेल. एक जबरदस्त संघटन उभारून ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या पाठीशी उभे राहून, त्यांना न्याय मिळवून देण्याची व्यवस्था आपण करायला हवी,' असंही शरद पवार म्हणाले. अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे - महात्मा फुले कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करायची असल्याने गेल्या वर्षीपेक्षा थोडा जास्त नियत्वे देण्यात आलाय. गेल्या पाच वर्षात ९८ कोटी रूपये पुण्याला कमी मिळालेत. किमान जास्त नाही मिळाले तरी ठीक पण जे ठरलं त्याप्रमाणे तरी द्यायला हवे होते.   - कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर यांची मागणी मान्य केली.  शाहू स्मारकाच्या कामासाठी निधी देण्याच्या निर्णय मुख्यमंत्र्यांना विचारून घेईन - अंबाबाई विकास आराखडा मंजूर करून पैसे देणार इचलकरंजी आणि रंकाळा, कळंबा तलावाच्या कामासाठी निधी देणार - पुरामध्ये वाहून गेलेले रस्ते बनवण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ६० कोटी दिले - कोल्हापुरमध्ये १ लाख रूपयापर्यंत मदत पूरबाधीतांना मदत केली आहे. त्यासाठी मान्यता आणि बजेट मध्ये तरतूद सुद्धा केली आहे. - कर्नाटक मधल्या पुलामुळे मागे पाण्याला फुगवटा येतो त्यामुळे मागे पूरस्थिती तयार होते - पूरस्थितीमध्ये काम करण्यासाठी नव्या बोटी आणि त्या चालवण्यासाठी स्थानिक १५ मुलांना ट्रेनिंग आणि लाईफ जॅकेट घ्यायला मंजूर - कास तलावाची उंची वाढवण्यासाठी निधीची तरतूद - साताऱ्यात शिवाजी महाराजांचं संग्रहालय तयार पण बाकी तयारीसाठी निधी देणार - सज्जनगडावर रोप वे साठी निधी पीपीपी माॅडेल वर करू - साताऱ्यात मेडीकल कॉलेज सुरू करण्यासाठी तरतूद , कृष्णा खोरेने २५ एकर जागा दिली - आदिवासींच्या शासकीय आश्रमशाळा चांगल्या पण खाजगी आश्रमशाळांसाठी सेंट्रल किचनचा विचार सुरू आहे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या