नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिर संस्थानचा महत्त्वाचा निर्णय

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिर संस्थानचा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील देवस्थान खुली करण्याची मागणी आता सगळीकडूनच जोर धरत आहे. त्यातच आता नवरात्री उत्सव येऊन ठेपला आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 07 ऑक्टोबर : राज्यातील देवस्थान खुली करण्याची मागणी आता सगळीकडूनच जोर धरत असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा यावर्षीचा शारदीय नवरात्र उत्सव भक्तांच्या उपस्थिती विना अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंदिर संस्थान घेतला आहे.

नवरात्र काळात तुळजाभवानी मंदिर परिसर आणि शहर जनतेसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती तहसीलदार तथा मंदिर संस्थांनचे व्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी दिली.  नवरात्र काळात भाविकांना दर्शनासाठी तुळजापूर शहरात वाहनाने अथवा पायी प्रवेश दिला जाणार नाही. तसंच, नवरात्र काळात कोजागिरी पौर्णिमा संपेपर्यंत नागरिक आणि भाविकांसाठी तुळजापूरात प्रवेशबंदी असणार आहे.

नवरात्रात देवीच्या नित्य पूजा कुलाचार, धार्मिक विधी हे दरवर्षी नियमाप्रमाणे होणार आहेत. मात्र, गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. सार्वजनिक मेळावे आणि समारंभ यांच्यावर निर्बंध घालण्यात आले असून उत्सवादरम्यान धार्मिक विधी काळात पुजारी, मानकरी आणि मंदिर अधिकारी असे 50 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नाही. पुजारी, मानकरी आणि कुलाचार करणारे नागरिक यांची रॅपिड अँटीजन टेस्ट बंधनकारक असणार आहे.

नवरात्र काळात भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी नवरात्र मंडळ आणि भाविकास बंदी असणार असून या काळात तुळजापूर शहरात प्रवेश बंद असणार असल्याने सर्व प्रवेशद्वार आणि रस्त्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून तुळजाभवानी मातेच्या रोजच्या धार्मिक पूजा विधी होणार आहेत.

तुळजापूर शहरामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. कोरोना संकटामुळे तुळजापूर प्रवेशबंदी असल्याने याची माहिती शेजारील राज्यांना दिली आहे.

Published by: sachin Salve
First published: October 7, 2020, 9:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या