मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय; पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय; पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली

कोरोनामुळे सर्वच देशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. राज्य सरकार यावर वेळीच उपाययोजना करेल अशी आशा आहे

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : देशभरात कोरोनाच्या संकटामुळे अनेक क्षेत्रात मोठे बदल करण्यात आले आहे. अनेक निवडणुकीही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र आता हळूहळू अनेक गोष्टी पुन्हा हळूहळू सुरू होण्यास सुरुवात होत. त्यातच महाराष्ट्र मंंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. येत्या 7 सप्टेंबर पासून राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसाळी अधिवेशन सुरू करण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून रोजी घेण्यात येणार होते. मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलून 3 ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरले होते. मात्र अद्याप कोरोनावर अपेक्षित नियंत्रण आणण्यात आले नसल्याने सप्टेंबर महिन्याच्या 7 तारखेला पावसाळी अधिवेश घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यातही अधिवेशन घेताना सरकार काही निर्बंध घालून अधिवेशन घेण्याच्या विचारात आहे.

हे वाचा-मोदी सरकारचा शिक्षण पद्धतीत मोठा बदल; यापुढे नसेल 10वी 12 वी बोर्डाची परीक्षा

विधानसभा आणि विधानपरिषदचे एकत्र सत्र न घेता, दोन दिवस विधानसभा आणि त्यानंतर दोन दिवस विधानपरिषद सभागृह चालवत येईल का, जेणेकरून जास्त आमदार आणि त्यांच्या पीएंची गर्दी होणार नाही. एकंदरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन घेताना अधिक काळजी घेतली जाणार आहे.

विधानसभा किंवा विधानपरिषदेच्या सभागृहात अधिवेशन न घेता सेंट्रल हॉलमध्ये बैठक घेता येईल का याचाही विचार सुरू आहे. जेणेकरून दोन आमदारांमध्ये सुरक्षित अंतर ठेवता येईल. शिवाय सर्वच आमदारांना बोलवण्याऐवजी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे येथील लोकप्रतिनिधींना बोलवून सभागृहाचे कामकाज चालवण्याचाही विचार आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब करण्यात आला नसून परिस्थिती पाहिल्यानंतर गरजेनुसार बदल केले जातील.

Published by: Meenal Gangurde
First published: July 29, 2020, 5:40 PM IST

ताज्या बातम्या