मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय, संचारबंदी लागू होणार

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय, संचारबंदी लागू होणार

पंढरपूर शहर आणि आसपासच्या दहा किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

पंढरपूर शहर आणि आसपासच्या दहा किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

पंढरपूर शहर आणि आसपासच्या दहा किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

पंढरपूर, 26 जून : आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांकडून गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंढरपूर शहर आणि आसपासच्या दहा किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

परजिलह्यातील आणि पंढरपूर बाहेरील कोणीही व्यक्ती पंढरपूरात येऊ नये यासाठी 29 जून ते 2 जुलै पर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. सोलापूर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आषाढी एकादशीला पंढरपुरातील नागरिकांना विठ्ठलाचे दर्शन देण्याची मागणी

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील नागरिकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाकडे केली आहे. यंदाच्या आषाढी एकादशीच्या दिवशी पर जिल्ह्यातून तालुक्यातून लोकांना पंढरपुरात प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. अशातच पंढरपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग असलेला कोणताही रुग्ण मागील पंधरा दिवसांपासून नाही.

त्यामुळे एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन पंढरपुरातील नागरिकांना करू द्यावं. सोशल डिस्टन्ंसिगचे नियम पाळत सॅनिटायझरचा वापर करून या दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य संघटक शॅडो कॅबिनेट सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि व्यवस्थापक पुदलवाड  यांच्याकडे केली आहे

देशातील सर्वात श्रीमंत असलेलं तिरुपती देवस्थान समितीने सुध्दा भाविकांसाठी दर्शन सुरू केलं आहे.  त्याच पद्धतीने किमान पंढरपुरातल्या नागरिकांना दर्शनाचा लाभ द्यावा अशी मागणी होत आहे.

First published:

Tags: Pandharpur, Pandharpur news