Home /News /maharashtra /

आरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

आरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

8 हजार 500 पदांची जाहिरात येत्या 2 दिवसात येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उस्मानाबाद येथे केली.

उस्मानाबाद, 17 जानेवारी : राज्य सरकार आरोग्य विभागातील 17 हजार पदे भरणार असून यापैकी 8 हजार 500 पदांची जाहिरात येत्या 2 दिवसात येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उस्मानाबाद येथे केली. 17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा व त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागेल, असी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. झिंझर नावाच्या आयटी कंपनीला नोकर भरती प्रक्रिया राबविण्याचे काम देण्यात आले असून क आणि ड वर्गातील पदे भरली जातील. यात नर्सेस वॉर्ड बॉय, क्लर्क व टेक्निशियनसह क आणि ड वर्गातील पदांचा समावेश आहे. या नोकर भरतीवेळी कोरोना काळात कंत्राटी काम केलेल्यांना प्राधान्य दिले जाणार नाही, मात्र कोरोना संकटकाळात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने काम केले. मात्र त्यांना नियमित नोकरीवर घेणे शक्य नसल्याने व सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयाप्रमाणे तसे करणे नियमबाह्य ठरणार असल्याने त्यांना वेगवेगळ्या भरती तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशन ( NHM) मधील पदांची भरती करताना प्राधान्य दिले जाणार आहे आणि त्यासाठी निवड प्रक्रियेतील नियमात आवश्यक ते बदल केले जातील असंही टोपे यांनी सांगितलं. .

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Job, Rajesh tope

पुढील बातम्या