मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विवाहितेचं पिझ्झा डिलिव्हरी बॉयशी जुळलं सूत, पिता-पुत्रानं असा काढला काटा

विवाहितेचं पिझ्झा डिलिव्हरी बॉयशी जुळलं सूत, पिता-पुत्रानं असा काढला काटा

अनैतिक संबंधाच्या कारणावरुन पिता-पुत्राने एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अनैतिक संबंधाच्या कारणावरुन पिता-पुत्राने एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अनैतिक संबंधाच्या कारणावरुन पिता-पुत्राने एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोलापूर,13 मार्च:अनैतिक संबंधाच्या कारणावरुन पिता-पुत्राने एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माढा तालुक्यातील लऊळ गावात ही घटना घडली आहे. राजाराम घुगे असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. राजाराम याने घरातील महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध ठेवले. त्यामुळे त्याचा काटा काढल्याची कबुली आरोपी खंडू गोरे आणि संतोष गोरे या पिता-पुत्राने दिली आहे. या प्रकरणी कुर्डुवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा.. ..तर घरात बोभाटा करीन; शरीरसंबंध ठेवण्यास वहिनीनं 15 वर्षीय दीराला केलं मजबूर कुर्डुवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजाराम घुगे हा मुळचा लऊळ गावचा रहिवासी होता. मात्र, नोकरीनिमित्त तो पुण्यात होता. पुण्यात पिझ्झा डिलिव्हरीचं काम करत होता. परंतु लऊळ गावातील गोरे कुटुंबीयांतील एका महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. यापूर्वी गोरे कुटुंबातील पिता-पुत्राने त्याला बजावलं होतं. मात्र राजारामने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यानेच त्याचा खात्मा केल्याची कबुली आरोपी पितापुत्राने दिली आहे. हेही वाचा..नागपुरात 'कोरोना'ची लागण झालेल्या रुग्णाची पत्नी व भावाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह राजारामला मारुन पिता-पुत्र पोलिस स्टेशनमध्ये हजर.. आमच्या घरातील विवाहित महिलेसोबत राजाराम घुगे याने अनैतिक संबंध ठेवल्याचे आम्हाला सातत्याने खटकत होतं. त्या दिवशी देखील आमचे याच कारणावरुन त्याच्याशी बाचाबाची झाली होती. आम्ही रागाच्या भरात धारदार लोखंडी कोयता, लाकडी बॅट, बांबूने त्याला जीवे ठार मारले, अशी कबुली आरोपी खंडू गोरे आणि संतोष गोरे या पिता-पुत्राने दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी दिली. दोन्ही आरोपी स्वतः हून पोलिस स्टेशनला जाऊन हजर झाले आहेत. दरम्यान, माढा न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. हेही वाचा..'चला हवा येऊ द्या' वादात, संभाजीराजेंनी निलेश साबळे आणि 'झी मराठी'ला दिला आक्रमक इशारा
First published:

पुढील बातम्या