मुंबई, 09 नोव्हेंबर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. कुर्ल्यामध्ये एलबीएस रोडवर जवळपास 3 एकराची जागा आहे. एलबीएस रोडवर अगदी महागडी जागा होती. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी मलिक कुटंबाच्या कंपनीला जमीन विकली. या कंपनीच्या वतीनं जागेच्या कागदपत्रांवर फराज मलिक यांनी सही केली आहे. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी ट्विटमध्ये लिहिलं की, आ रहा हूँ मैं.
आ रहा हूँ मैं
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 9, 2021
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
सरदार शहाबअली खान. हे 1993 च्या बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप होती आणि ती कायम केली. याच्याकडे मुंबई महापालिका आणि बीएसीची रेकी केली आणि टायगर मेमनच्या घरी तो होता. त्याने बॅाम्ब बनवत होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. सॅालिडस असे नाव आहे. फराझ मलिक नवाब मलिक यांच्या मुलाने खरेदी केली.त्यावेळी जमिनीचा दर काय होता ही जमीन 30 लाखात विकत घेतली होती, असा खुलासा फडणवीस यांनी केली आहे.
हेही वाचा- राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता उद्धव ठाकरेही करणार नव्या घरात गृहप्रवेश
सलीम पटेल हे दुसरे कॅरेक्टर आहे. आरआर पाटील बरोबर ज्या माणसाचा फोटो होता तो हा. हा हसिना पारकरचा ड्राईव्हर होता. दाऊद भारतातून गेल्यावर सर्व संपत्ती सलीम पटेलच्या नावे पावर ॲाफ अटर्नी होत होती. कुर्ल्यात 3 एकर जागा ज्याला गोवावाला कंपाऊड म्हणतात. जी एलबीएस रोडवर आहे. या जमिनीची रजिस्ट्री सॅालिटेअर नावाच्या कंपनीला विकली, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Nawab malik