परतीच्या पावसानं बळीराजाला रडवलं, मुंबईसह आजही राज्यात मुसळधार

परतीच्या पावसानं बळीराजाला रडवलं, मुंबईसह आजही राज्यात मुसळधार

प्रशासनाने खरीप पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश काढल्यानंतर महसूल, कृषी आणि ग्राम विकास खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पीकांचे पंचनामे सुरू केले आहेत.

  • Share this:

02 नोव्हेंबर, मुंबई: राज्यात येत्या 48 तासांत कोकणासह, पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आधी क्यार चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. क्यारनंतर आता महाचक्रीवादळाचा थेट मोठा धोका महाराष्ट्राला नसला तरीही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे. तातडीनं नुकसान भरपाई मिळाली नाही तर आधीच हवालदिल झालेली शेतकरी आणि खचून जाईल. त्यामुळे तातडीनं सरकारनं मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पालघर, ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मनमाड आणि नांदगावला पावसाचा हाहाकार बघायला मिळत आहे. शुक्रवारी रात्रभर मुसळधार पावसाने दोन्ही शहरांना अक्षरशः झोडपून काढल्यामुळे मनमाड मधून वाहणाऱ्या  रामगूळणा आणि पांझण तर नांदगांव मधून वाहणाऱ्या शाकांबरी आणि लेंडी या नद्यांना पूर आला. दोन्ही शहरातील नदी शेजारील वसाहतीत पुराचे पाणी शिरले आहे. वसाहतींमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग होत असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वेचा बंधारा आणि वागदरडी धरण ओवर फ्लो झालं.  त्यामुळे तब्बल 12 वर्षा नंतर दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत तर दुसरीकडे नांदगावच्या नद्यांना देखील सुमारे 5 वर्षा नंतर पूर आला आहे.

वायू प्रदूषणापासून स्वतःला वाचवण्यासाठी काय करावं आणि काय करू नये, एकदा वाचाच!

भुसावळमध्ये परतीच्या पावसामुळे खरीप पिकातील मका ज्वारी कपाशी यासह इतर पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झालं.  शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास ओल्या दुष्काळाने हिरावून घेतला. प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातो आहे. वाशिम जिल्ह्यात  सतत परतीचा पाऊस कोसळत असून मानोरा व कारंजा तालुक्यात जोरदार पाऊस पडलाय. जिल्ह्यातील सर्व 6 ही तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांसह जिल्हावासी त्रस्त झाले आहेत. या पावसाचा मोठा फटका शेतीला बसला असून सतत च्या पावसाने शेती मशागतीची कामे करता येत नसल्याने जमीन पडीक राहण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरिपाच्या सोयाबीन, कपाशी ज्वारी ,बाजरी व इतर पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे.या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पिकांच्या पंचनाम्यांची गरज होती. प्रशासनाने जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश काढल्यानंतर महसूल,कृषी व ग्राम विकास खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पीकांचे पंचनामे सुरू केले असून हे कर्मचारी प्रत्येक शेतात जाऊन पिकांची पाहणी करत आहेत.

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे येत्या आठवडाभरात पूर्ण होतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं केलेले पंचनामेच ग्राह्य धरा, असे आदेश विमा कंपन्यांना दिलेत, आणि काही कारणास्तव पंचनामे होऊ शकले नाहीत तर शेतकर्यांनी फोटो काढून पाठवावेत, ते ग्राह्य धरले जातील, असंही मुख्यमंत्री म्हणाले. अवकाळी पावसामुळे शेती नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज आढावा घेणार आहेत .मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज दुपारी 12 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे.

पोरांची फी बाकी, मंत्रालयासमोर आत्महत्याच करेन; पवारांसमोर शेतकरी ढसाढसा रडला

First published: November 2, 2019, 8:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading