सावधान.. पुढच्या दोन दिवसांसाठी हवामान खात्याने दिलाय हा इशारा

सावधान.. पुढच्या दोन दिवसांसाठी हवामान खात्याने दिलाय हा इशारा

पुढच्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 20 डिसेंबर : येत्या दोन दिवसात विदर्भासह राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. गुरुवारी सकाळी नागपूरचा पारा 8.6 अंशांपर्यंत खाली आला होता. तसंच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानातसुद्धा गुरुवारी सरासरिच्या तुलनेत चांगलीच घट झाली होती. दरम्यान, पुढील दोन दिवसात विदर्भाचं किमान तापमान एक ते दोन अंशांनी आणखी कमी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

‘पेथाई’ चक्रीवादळ ओसरल्यानंतर उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने राज्याला हुडहुडी भरली आहे. गेल्या आठवड्यात महाबळेश्वरचा पारा 7 अंशापर्यंत खाली आला होता. त्यानंतर गुरुवारी नगर येथे 6.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं. त्याच खालोखाल औरंगाबाद, नागपूर आणि पुण्याच्याही किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. गुरुवारी औरंगाबादेत 8.0, नागपूर 8.6 तर पुण्यात 8.8 अंश सेल्सीयस किमान तापमानाची नोंद झाली. वाढत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे राज्यात अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली असून, तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांत विदर्भ आणि मराठवाड्याच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. तर कोकण, गोवा आणि राज्याच्या उर्वरित भागात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. 24 डिसेंबरपर्यंत विदर्भात जास्त थंडी पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.

गुरुवारी राज्यातील विविध ठिकाणचं किमान तापमान असं होतं..

मुंबई (कुलाबा) 20.5

मुंबई (सांताक्रूज) 15.0

रत्नागिरी 17.4

पणजी (गोवा) 20.0

पुणे 8.8

अहमदनगर 6.4

जळगाव 9.0

कोल्हापूर 14.9

महाबळेश्वर 11.0

मालेगाव 9.6

नाशिक 9.3

सांगली 11.5

सातारा 10.9

सोलापूर 13.3

उस्मानाबाद 10.2

औरंगाबाद 8.0

परभणी 9.9

नांदेड 10.0

नागपूर 8.6

अकोला 10.2

अमरावती 10.6

बुलडाणा 10.8

ब्रम्हपूरी 9.9

चंद्रपूर 10.2

गोंदिया 11.0

वर्धा 10.9

यवतमाळ 9.4

 VIDEO: कांद्यानेच मंत्र्यांना शुद्धीवर आणा आणि परत कांदा फेकून मारा - राज ठाकरे

First published: December 20, 2018, 5:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading