मान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी

मान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी

मॉन्सून विभागाचा अंदाज चुकल्याने विदर्भातल्या शेतकऱ्यांनी केली हवामान खात्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • Share this:

प्रविण मुधोळकर,नागपूर,ता.15 ऑक्टोबर : शेतकरी पेरणी करतो तो हवामान विभागाच्या अंदाजावर पण हा अंदाजच चुकला तर? दरवर्षी या अंदाजावर विनोदही होतात. यावर्षी मान्सून विभागाचा अंदाज चुकला आणि आम्हाला नुकसान सोसावं लागलं असा आरोप करत नागपूरच्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आणि हवामान खात्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मान्सूनच्या दुसऱ्या टप्पात पावसामध्ये मोठा खंड पडल्याने राज्यातील खरीपाचे पीक 20 टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसात खंड पडल्यान खरीप अडचणीत आला असतांनाच आता नोहेंबर पासून सुरु होणारा रब्बीही हंगामालाही कमी पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.

त्यातच हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने नाराज शेतकरी आंदोलन करताहेत तर काही शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात पोहोचून हवामान खात्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर दरवर्षी मुबलक उत्पादन घेणाऱ्या नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील या धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी अत्यल्प पाणी मिळाले.

सुरवातीला पावसाने खंड दिला नंतर ऑगस्टच्या शेवटी मुसळधार पाऊस आला. पण आता धानाच्या पिकाला पाण्याची आवश्यकता आहे. कमी पावसामुळे आणि अपुऱ्या नियोजनामुळे पाणी मिळत नाही. हवामान खात्याने जाहीर केलेला अंदाज त्यांना चूक वाटतोय.

आम्ही कसं बसं पीक जगवलं पण आता पाणी आणायचं कुठून हा प्रश्न आहे. नियोजन नाही, कालवे फुटून पाणी वाया जाते. आम्हाला पाणी मिळत नाही असा आक्रोश शेतकऱ्यांनी केलाय. तर हवामानाचा अंदाज फक्त दोन टक्के चुकला असा खुलासा नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याचे संचालक ए. डी. ताथे यांनी केलाय.

VIDEO : 3000 किलोची खिचडी शिजवणाचा विष्णू मनोहर यांचा विश्वविक्रम

 

First published: October 15, 2018, 6:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading