मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उद्यापासून राज्यात पावसाचं पुनरागमन; कोकणासह मुंबई, ठाण्यात ऑरेंन्ज अलर्ट

उद्यापासून राज्यात पावसाचं पुनरागमन; कोकणासह मुंबई, ठाण्यात ऑरेंन्ज अलर्ट

Heavy rainfall in Mumbai: काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस (Heavy rainfall)आता पुन्हा राज्यात सक्रिय (Monsoon active) होणार आहे.

Heavy rainfall in Mumbai: काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस (Heavy rainfall)आता पुन्हा राज्यात सक्रिय (Monsoon active) होणार आहे.

Heavy rainfall in Mumbai: काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस (Heavy rainfall)आता पुन्हा राज्यात सक्रिय (Monsoon active) होणार आहे.

मुंबई, 10 जुलै: काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस (Heavy rainfall)आता पुन्हा राज्यात सक्रिय (Monsoon active) होणार आहे. कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rainfall) जोरदार हजेरी लावली. हवामान खात्यानं (IMD)कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात ऑरेंन्ज अलर्ट (orange alert) जारी केला आहे. 11 जुलैपासून म्हणजेच उद्या पासून तीन दिवस वेगळ्या ठिकाणी मुसळधार (heavy rains)ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

9 ते 13 जुलै या दरम्यान संपूर्ण राज्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही 12 ते 13 जुलै रोजी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पावसाच्या सक्रियतेनंतर पाण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकणार आहे.

बंगालचा उपसागर आणि ओडिशा, पश्चिम बंगालच्या समुद्र किनारपट्टी भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागात रखडलेला मोसमी पाऊस कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा सक्रिय होणार आहे.

हेही वाचा- चालत्या कारच्या बोनेटवर बसून स्टंट, पोलिसांनी पाठवलेलं चलान बघून घाबरला मालक

पुढील पाच दिवस पुण्यात मुसळधार पाऊस

भारतीय हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, पुढील पाच दिवस पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या पुण्यात मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील. पण 11, 12 आणि 13 जुलै या तीन दिवशी पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे 11 जुलैपासून पुढील तीन दिवस पुण्यात मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्याच्या साथीनं मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

First published:

Tags: Mumbai rain, Rain