मुंबई, 15 एप्रिल: आधीच कोरोनाचं महासंकट असताना शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. यंदा मान्सून चांगला होणार आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस चांगला होणार असल्यानं शेतकऱ्यांना यावेळी पेरणी वेळेत करता येणार आहे. 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 96 ते 100 टक्के पाऊस पडेल असं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
अवघा देश कोरोना सारखा महासंकटाचा सामना करत असताना दुसरीकडे हवामान विभागानं दिलासादायक बातमी दिली आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 या वर्षात मान्सूनचा पाऊस हा दीर्घकालीन सरासरीच्या 100 टक्के असेल, तर मॉडेलच्या त्रुटीमुळे +5 किंवा -5% असा त्रुटी येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
हे वाचा-'मुंबईची इटली होणार', बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीने व्यक्त केली भीती
मान्सन कधी येईल? काय आहे हवामान खात्याचा अंदाज
दरवर्षी मान्सून पहिल्यांदा केरळमध्ये येतो आणि त्यानंतर महाराष्ट्रात. यंदा हा मान्सून वेळेत म्हणजे 1 जूनपर्यंत दाखल होईल. त्यानंतर चेन्नईकडून 4 जून पंजाब 7 जून, हैदराबाद 8 जून, पुणे 10 आणि मुंबई 11 जून असा प्रवास करत दिल्लीपर्यंत 27 जूनला पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामानातील बदलांमुळे यावेळी मान्सून दहा दिवस उशीरा निघेल असाही हवामान विभागाचा कयास आहे.
This year we will have a normal monsoon. Quantitatively the monsoon rainfall, during the monsoon season 2020, is expected to be 100% of its long period average with an error of +5 or -5% due to model error: Madhavan Rajeevan, Secretary, Ministry of Earth Sciences (MoES). pic.twitter.com/gjgM0Ta1N8
— ANI (@ANI) April 15, 2020
हवामान विभागानं बुधवारी मान्सूनचं पूर्व अनुमान जारी केलं आहे. यामध्ये यंदा 96 ते 100 टक्के म्हणजे चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. मागच्या वर्षी मान्सून उशिरा आला होता आणि पाऊस कमी पडल्यानं शेतकऱ्यांची पेरणीही लांबली होती. मोठं नुकसान झालं होतं यंदा मात्र मान्सून वेळेत येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पेरणी वेळेत होईल याचा दिलासा मिळाला आहे.
हे वाचा-'उद्धवा... बाळासाहेबांच्या बछड्या.. तू लढ', मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IMD, IMD FORECAST, Weather forcasts, Weather report, Weather updates