Maharashtra Rain: उद्यापासून 3 दिवस राज्यात पावसाची शक्यता, 15 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी

Maharashtra Rain: उद्यापासून 3 दिवस राज्यात पावसाची शक्यता, 15 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी

हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्रातील बर्‍याच भागात पाऊस पडेल. अशा परिस्थितीत सावधगिरी म्हणून 15 जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई 15 फेब्रुवारी : देशाच्या अनेक भागांमध्ये अजूनही थंडी (Winter)कायम आहे. दरम्यान, पश्चिम भागातील परिस्थितीमुळे देशात बर्‍याच भागात पाऊस आणि बर्फवृष्टीचीदेखील शक्यता आहे. 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची चर्चा आहे. तसंच, हवामान खात्यानं महाराष्ट्रातही पावसाचा (Maharashtra Rain) अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्रातील बर्‍याच भागात पाऊस पडेल. अशा परिस्थितीत सावधगिरी म्हणून 15 जिल्ह्यात यलो अलर्ट(Yellow Alert) देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या (IMD) म्हणण्यानुसार, 16 फेब्रुवारीपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपलं धान्य झाकून ठेवण्याचा सल्ला दिला गेला आहे.  हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील बर्‍याच भागात वादळासह विजांचाही  धोका आहे.

या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता -

राज्यातील हिंगोली, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, परभणी, अकोला, अमरावती. बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची आहे. यादरम्यान मेघगर्जनांची शक्यताही आहे. हवामान विभागानं, 16 फेब्रुवारीला हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवत यलो  अलर्ट जारी केला आहे.

सोबतच 17 आणि 18 फेब्रुवारीला परभणी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याततही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, पुणे, बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात 18 फेब्रुवारीला यलो अलर्ट जारी केला आहे. सोबतच यादरम्यान राज्यातील अनेक भागात किमान तापमानात घट होण्याचा अंदाजही हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे.

Published by: Kiran Pharate
First published: February 15, 2021, 9:57 AM IST

ताज्या बातम्या