• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Weather Forecast: महाराष्ट्रात अवकाळीचं सावट कायम; येत्या 5 दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

Weather Forecast: महाराष्ट्रात अवकाळीचं सावट कायम; येत्या 5 दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

Weather Forecast Today: येत्या चार-पाच दिवसांत राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासोबतच विजांच्या गडगडाटाच्या साथीनं पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 एप्रिल: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा आणि हवामान बदलाचा जोर कायम आहे. काल दुपारी भर उन्हात चंद्रपूरला अवकाळी पावसानं (Unseasonal rain) झोडपलं आहे. विदर्भात एकीकडे तापमान वाढत (temperature in vidharbha) असताना चंद्रपूरात पावसाच्या सरी कोसळल्यानं अल्हाददायक वातावरणाची अनुभूती चंद्रपूरकरांना आली. पण ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत ढगाळ वातावरणामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना रात्रीच्या वेळी उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. त्यानंतर राज्यातील तापमान हळूहळू वाढत जाऊन उन्हाचे चटके बसायला सुरुवात केली होती. तेवढ्यात हवामानाने पून्हा यु-टर्न घेतला आहे. आता येत्या चार-पाच दिवसांत राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासोबतच विजांच्या गडगडाटाच्या साथीनं पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्या महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यातील हवामान शुष्क राहणार असून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे ही वाचा- 25 ते 28 एप्रिल दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर 27 आणि 28 एप्रिल रोजी कोकण आणि गोव्यासह उर्वरित मध्य भारतात अवकाळी पाऊस पडू शकतो. सध्या दक्षिण तमिळनाडू आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे दक्षिणेकडील बहुतांशी राज्यात अवकाळी पावसाची (Non seasonal Rain) स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर आणि पूर्वेकडील काही राज्यातही पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: