सावधान! 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

सावधान! 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर: गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांचा विचका यंदा पावसानं केला आहे. साधारण दिवाळी आली की थंडीला सुरुवात होते. मात्र ऑक्टोबर महिना संपत आली तरीही पाऊस मात्र कमी होण्याचं नाव घेत नाही. सिंधुदुर्गात गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. तर शुक्रवारी मुंबईसह उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस असेल असा अंदाज वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग नगर, सातारा, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबादमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकण किनापट्टीजवळील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या परिसरात वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.राज्यात 27 ऑक्टोबरपर्यत पाऊस राहणार असून बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस स्थिती निर्माण झाल्याचे पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई वेधशाळेने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचं प्रमाण कमी-अधिक असेल. त्यामुळे गुलाबी थंडीत येणारी दिवाळी यावेळी ऐन पावसात साजरी करावी लागणार, अशी चिन्हे आहेत.

नवी Advance Audi A6 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रात आजपासून पावसाचा धुमाकूळ, अतिवृष्टीचा इशारा

विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात भाजपला दणका बसला आणि काँग्रेस - राष्ट्रवादीवर मतांची बरसात झाली. आता निकाल लागल्यानंतर मात्र याच भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.पुढचे 72 तास कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. 25, 26 आणि 27 ऑक्टोबर हे तिन्ही दिवस इथे अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा या भागांत सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने पूर आला. त्यामुळे अतिवृष्टीचा इशारा मिळताच तहसीलदार, प्रांत, तलाठी या अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस होईल,असा अंदाज आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची तयारी सुरू आहे. गुरुवारी दुपारपासूनच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांचं तर काही ठिकाणी कापून झोडपणीला ठेवलेल्या पिकांचं भिजून मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पीकं भुईसपाट झाल्यानं शेतकरीही हवालदिल झाला आहे.

दिवाळी आली तरी अजूनही महाराष्ट्रात पाऊस बरसतोच आहे. पश्चिम महाराष्ट्रातली अनेक गावं महापुरातून सावरतायत. त्यातच परतीच्या मुसळधार पावसाची चिन्हं आहेत.दिवाळीच्या उत्साहावर यामुळे पाणी फेरलं जाऊ नये, असंच सगळ्यांच्या मनात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 09:37 AM IST

ताज्या बातम्या