पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रास दारु विक्री.. महिला म्हणाली, 'त्यांना' आम्ही हप्ता देतो

पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रास दारु विक्री.. महिला म्हणाली, 'त्यांना' आम्ही हप्ता देतो

पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चास गावात पोलिसांच्याच आशीर्वादाने महिला सर्रास दारु विक्री करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

  • Share this:

रायचंद शिंदे (प्रतिनिधी),

शिरुर, 18 मे- पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चास गावात पोलिसांच्याच आशीर्वादाने महिला सर्रास दारु विक्री करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. दारुविक्री करणाऱ्या महिलांना गावातील महिला जाब विचारण्यासाठी गेल्या असता, संपूर्ण गावालाच ठार मारण्याची धमकीच दारु विक्रेत्या महिलांनी दिली आहे.

सुडाने पेटलेल्या माथेफिरूने विहिरीच्या पाण्यात टाकले विष, संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न

चासमध्ये मागील अनेक दिवसांपासून अवैध दारुविक्री होत आहे. त्यामुळे या गोष्टीला आळा बसावा, यासाठी काही महिला आणि ग्रामस्थ पुढे आले. गावाबाहेरील दारु विक्री करणाऱ्या महिलांच्या घरावर धडक करवाई करत उकिरड्यात लपवून ठेवलेले दारुचे ड्रम फोडले. यावेळी दारु विक्री करणाऱ्या महिलांनी संपूर्ण गावालाच मारण्याची धमकी दिल्‍याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे चास गावातील जनता दहशतीखाली आहे. चास येथील कालव्याजवळ असणार्‍या दारू धंद्‍यावर येथील काही महिला व तरुणांनी जाऊन दारुचे कॅन फोडून टाकले. यावेळी दारु विक्री करणार्‍या महिलांनी तरुणांना जोरदार प्रतिकार केला. यावेळी तरुणांनी दारुचे कॅन जमिनीतून काढून त्‍यातील दारु रस्‍त्‍यावर ओतल्‍याने या महिलांचा राग अनावर झाला. या दारु विक्री करणार्‍या महिलांनी संपूर्ण गावालाच ठार मारण्याची धमकी दिली. बेकायदेशीर दारु विक्रीसाठी कोणा कोणाला पैसे दिले जातात, याचा उलगडा दारुविक्री करणाऱ्या महिलांनी केला आहे. यामुळे गावामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

रेश्मा पडनेकूर हत्येप्रकरणी MIM चा नगरसेवक तौफिक शेख विरोधात गुन्हा दाखल

VIDEO : केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना

First published: May 18, 2019, 5:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading