शिरूरमध्ये 'मुळशी पॅटर्न', एकच जमीन विकली तिघांना, सरपंचविरोधात गुन्हा

शिरूरमध्ये 'मुळशी पॅटर्न', एकच जमीन विकली तिघांना, सरपंचविरोधात गुन्हा

पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी एकच जमिनीची अनेकांना विक्री करून, खरेदीखत करून फसवणूक केली जात असल्याच्या घटना समोर येत असताना शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा येथील सरपंच रवींद्र दोरगे त्यांच्या मालकीच्या जमिनीची तिघांना विक्री करून फसवणूक केली असल्याची घटना समोर आली आहे

  • Share this:

रायचंद शिंदे (प्रतिनिधी)

शिरुर, 19 मे- पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी एकच जमिनीची अनेकांना विक्री करून, खरेदीखत करून फसवणूक केली जात असल्याच्या घटना समोर येत असताना शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा येथील सरपंच रवींद्र दोरगे त्यांच्या मालकीच्या जमिनीची तिघांना विक्री करून फसवणूक केली असल्याची घटना समोर आली आहे. शिक्रापूर पोलिसांत टाकळी भीमाच्या सरपंचावर फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला दिली आहे.

SPECIAL REPORT : मामाच्या गावाला जाऊया आणि पाणी भरूया!

टाकळी भीमाचे सरपंच रवींद्र दोरगे यांनी त्यांच्या जमीन गट नंबर 543 मधील 64 गुंठे जमीन दत्तात्रय पासलकर यांना ऑक्टोबर 2015 मध्ये तळेगाव दुय्यम निबंधक कार्यालय येथे नोंदणी क्रमांक 6205/2015 या नोंदणी क्रमांकाने खरेदीखत करून विक्री केली होती. सदर जमिनीचा मोबदला म्हणून ठरलेली वीस लाख रुपये रक्कम पासलकर यांनी चेकद्वारे रवींद्र दोरगे यांना दिलेली होती. सदर रक्कम दोरगे यांच्या बँक खात्यावर जमा देखील झालेली आहे. रक्कम दोरगे यांच्या बँक खात्यावर जमा झाल्यानंतर डिसेंबरमध्ये पासलकर यांनी टाकळी भीमा गावकामगार तलाठी यांच्याकडे सदर जमिनीच्या सातबारामध्ये पासलकर यांच्या नावाची नोंद होण्यासाठी सदर जमिनीच्या खरेदी खताच्या दस्ताची प्रत देऊन अर्ज केला. त्यावेळी तलाठी यांची याबाबत नोंद करून घेतो असे सांगितले. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी पासलकर यांनी सदर जमिनीच्या सातबारामध्ये त्यांच्या नावाची नोंद का झाली नाही याबाबत चौकशीसाठी टाकळी भीमा तलाठी कार्यालय येथे चौकशी केली असताना रवींद्र दोरगे यांनी पासलकर यांच्या आधीच श्वेता सुदीप गुंदेचा (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांना सदर जमिनीची विक्री केली असून त्याचा नोंदणी क्रमांक 6129/2015 असा आहे व गुंदेचा यांनी यापूर्वी सदर जमिनीवर त्यांच्या नावाच्या नोंदीसाठी अर्ज दिलेला असल्याने सदर सातबारामध्ये जमीन गट नंबर 543 मधील 64 गुंठे जमिनीवर श्वेता गुंदेचा यांच्या नावाची नोंद लागलेली असल्यामुळे तुमच्या नावाची नोंद लावता येणार नसल्याचे तलाठी यांच्याकडून समजले.

सूडाने पेटलेल्या माथेफिरूने विहिरीच्या पाण्यात टाकले विष, संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न

त्यांनतर पासलकर यांना त्याच जमिनीचे खरेदीखत रवींद्र दोरगे यांनी पासलकर यांच्यासह श्वेता सुदीप गुंदेचा तसेच शिक्रापूर येथील चेतन बळीराम कड (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांना देखील दुय्यम निबंधक कार्यालय शिरूर येथे 5294/2015 या नोंदणी क्रमांकाने खरेदीखत करून देऊन जमिनीची विक्री केली असल्याचे समजले. त्यांनतर दत्तात्रय पासलकर यांनी रवींद्र दोरगे यांच्याकडे जाऊन वीस लाख रुपये परत देऊन सदर व्यवहार रद्द करण्याबाबत सांगितले असता, रवींद्र दोरगे यांनी त्याबाबत नकार दिला त्यामुळे रवींद्र दोरगे यांनी दत्तात्रय पासलकर यांची आर्थिक फसवणूक केली असल्याने याबाबत दत्तात्रय रामचंद्र पासलकर (रा. केसनंद ता. हवेली जि. पुणे ) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलीसानी टाकळी भीमाचे सरपंच रवींद्र बाळासाहेब दोरगे (रा.टाकळी भीमा, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करत आहे.

मारूती कारच्या शोरूममध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

First published: May 19, 2019, 10:06 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading