मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रेकॉर्डवरील फरार आरोपी थेट अनिल देसाईंच्या स्वागताला, पोलिसांची फक्त बघ्याची भूमिका?

रेकॉर्डवरील फरार आरोपी थेट अनिल देसाईंच्या स्वागताला, पोलिसांची फक्त बघ्याची भूमिका?

बीड (Beed) जिल्ह्यात गुटख्याची तस्करी प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक कुमावत यांनी नांदूरघाट (Nandurghat) , इमारपूर (Imarpur) आणि बीडमध्ये गुटख्याच्या गोदामावर छापे टाकले होते. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khade हेच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झालं होतं.

पुढे वाचा ...

बीड, 19 नोव्हेंबर : अवैध गुटखा तस्करी (Illegal Gutka smuggling) प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि रेकॉर्डवरील फरार असलेला शिवसेनेचा (ShivSena) जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khade) आज बीड शहरातील शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमात दिसून आला. त्याच्या विरोधात अवैध गुटखा प्रकरणात केज पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्याची पोलीस रेकॉर्डवर फरार आरोपी (Accused) म्हणून नोंद आहे. मात्र तोच आरोपी थेट शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांच्या स्वागताला हजर राहिला. विशेष म्हणजे या आरोपीला बीड पोलिसांनी (Beed Police) अटक का केली नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसेच बीड शहरामध्ये चौकाचौकात त्याचे बॅनर (Banner) देखील लागले आहेत. सामान्यांसाठी वेगळा न्याय आणि सत्ताधारी पक्षाच्या आरोपीला वेगळा न्याय? असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक कुमावत यांनी नांदूरघाट, इमारपूर आणि बीडमध्ये गुटख्याच्या गोदामावर छापे टाकले होते. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हेच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हाप्रमुख खांडे फरार असल्याचं पोलीस रेकॉर्डवर आहे. मात्र फरार खांडे शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांचे बीडमध्ये स्वागत करण्यासाठी जिल्हाप्रमुख म्हणून कार्यक्रमात हजर झाले. विशेष म्हणजे जाहीर कार्यक्रमात पोलिसांच्या समोर फरार आरोपी खांडे हजर होते. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा : ST महामंडळाचं खरंच खासगीकरण होणार का? अनिल परबांनी दिलं 'हे' उत्तर

अनिल देसाई यांची प्रतिक्रिया

कुंडलिक खांडेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लवकरच कारवाईचा निर्णय घेतील. त्यांच्यावर आरोप आहेत. चौकशी सुरु आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली.

कुंडलिक खांडे यांची प्रतिक्रिया

कुंडलिक खांडे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता, "मला या प्रकरणात गुंतवले जात आहे. तसेच कलम 169 नुसार माझे नाव या प्रकरणातून वगळण्यात येणार आहे. तसे पोलिसांनी मला सांगितले आहे. कार्यकर्त्यांचा फोन आला म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो. यात माझा कसलाही संबंध नाही. मला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण माझा व्यवस्थेवर विश्वास आहे", अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा : कृषी कायदे रद्द केल्यानंतर शरद पवारांचा भाजपला सणसणीत टोला, म्हणाले....

मुख्यमंत्री कारवाई करणार की पाठीशी घालणार?

दरम्यान, सत्ताधारी पक्षाचा आरोपी असल्यामुळे त्याला अटक केली जात नाही का? असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जातोय. तसेच आरोपी असताना जाहीर कार्यक्रमात मिरवणारे कुंडलिक खांडे यांना कायद्याचा धाक उरला नाही का? अनिल देसाई बीड शहरामध्ये आले असता त्यांच्या स्वागतासाठी बीड शहरातील महत्त्वाच्या जागेवर चौकाचौकात जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे बॅनर, होर्डिंग्स झळकत आहेत. त्यामुळे खरंच पोलिसांना आरोपी सापडत नाहीत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अशा फरार अन् गुटखा तस्कर आरोपीला पाठीशी घालणार की कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .

First published: