पुण्यात नदीपात्रातील बेकायदा बांधकामं तात्काळ पाडून टाका,हरित लवादाचे आदेश

पुण्यात नदीपात्रातील बेकायदा बांधकामं तात्काळ पाडून टाका,हरित लवादाचे आदेश

पुण्यातील म्हात्रे पूल ते राजाराम पुलादरम्यानच्या रस्त्यावर लग्नसमारंभाचे हॉल आणि हॉटेल्सनी भरलेला आहे. याठिकाणची बहुतांश बांधकामं अनधिकृत आहेत.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे

05 जुलै : पुण्यातील म्हात्रे पूल ते राजाराम पुलादरम्यानच्या रस्त्यावर लग्नसमारंभाचे हॉल आणि हॉटेल्सनी भरलेला आहे. याठिकाणची बहुतांश बांधकामं अनधिकृत आहेत. यावषयी तिथल्या नागरिकांनी वारंवार तक्रार केली, आयबीएन लोकमतनेही या बातमीचा पाठपुरावा केला आहे. आता राष्ट्रीय हरीत लवादाने हरित पट्ट्यातील बेकायदा बांधकामं तात्काळ पाडून टाकण्याचे आदेश दिलेत.

म्हात्रे पूल ते राजाराम पुलादरम्यानचा रस्ता डीपी रस्ता म्हणून ओळखला जातो. इथं पालिकाचे बाबू आणि काही लोकप्रतिनिधींच्या संगनमताने लग्नसमारंभाचे मोठमोठे हॉल्स आणि हॉटेल्स आहेत. या हरित पट्ट्यात बहुतांश बांधकामं अनधिकृत आहेत. त्यात मिरवणुका, फटाक्यांचा आवाज, गाड्यांची गर्दी, वाहतूक कोंडी याचा स्थानिकांना त्रास होत असल्यानं त्यांनी हरित लवादात तक्रार केली होती. इथं वाजवण्यात येणाऱ्या फटाके आणि मिरवणुकांवर हरित लवादाने बंदी आणलीये. आता हरित लवादाने ही सगळी बांधकामच पडून टाकण्याचे आदेश दिलेत..

या हरित पट्ट्यात उभारण्यात आलेल्या मंगल कार्यालयामध्ये होणारं ध्वनी प्रदूषण, वाहतुकीची समस्या अश्या सगळ्याचं गोष्टींचा अंतर्भाव या याचिकेत करण्यात आला होता. त्यावर वेगवेगळ्या विभागांकडून याबाबतचे खुलासे मागवल्यानंतर जे तथ्य समोर आलंय. त्यावर हरितपट्ट्यातील बेकायदा बांधकाम पाडण्याचे,ध्वनी प्रदूषण बंद करण्याचे आदेश हरित लवादाने दिलेत. संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यासाठी हा निकाल लागू असणार आहे.

हरित लवादाच्या दट्टयानंतर महापालिका आता काय कारवाई करते का बड्या नेत्यांच्या कुटुंबियांची ही कार्यालयं असल्याने कारवाई होत नाही हे पाहायचं.

First published: July 5, 2017, 10:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading