Home /News /maharashtra /

आर्वी गर्भपात प्रकरणाला नवे वळण, डॉक्टराच्या घरात सापडली तब्बल 90 लाखांची रोकड!

आर्वी गर्भपात प्रकरणाला नवे वळण, डॉक्टराच्या घरात सापडली तब्बल 90 लाखांची रोकड!

नीरज कदम याचे वडील कुमारसिंग कदम हे सुद्धा रुग्णालयात असल्याने एका खोलीला लॉक होते.

    नरेंद्र मते, प्रतिनिधी आर्वी, 22 जानेवारी : वर्धा (wardha) जिल्ह्यातील आर्वी (aarvi) येथील गर्भपात प्रकरणामुळे (illegal abortion case) अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होते. बडतर्फ केलेल्या डॉ. नीरज कदम (neeraj kadam) याच्या घराची झाडाझाडती घेतली असता खोलीत 90 लाखांची रक्कम आढळली आहे. आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत एकूण सहा लोकांना अटक केली आहे. याच प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी कदम याचे रुग्णालयावर असलेल्या घरात पहिले तपासणी केली होती. मात्र त्यावेळेस डॉक्टर नीरज कदम यांच्या आई डॉ. शैलजा कदम यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने शैलजा कदम यांना नागपूर येथे रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. (मला विचारून लफडं केलं का? नवनीत राणांचा पीडितेला उलट सवाल, AUDIO क्लिप व्हायरल) शैलजा यांच्यासोबत नीरज कदम याचे वडील कुमारसिंग कदम हे सुद्धा रुग्णालयात असल्याने एका खोलीला लॉक होते. त्याच्या चाव्या या कुमारसिंगकडे असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे पोलिसानी ती खोली सील केली होती. आज शनिवारी कदम कुटुंबीयाकडून त्या खोलीची चावी पोलिसांना सुपूर्द केली असता पोलिसांनी खोली उघडून पोलिसांनी तपासणी केली असता तब्बल 90 लाखांचे घबाड हाती लागले. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून अधिक तपास सुरू आहे. डॉक्टर कदम अखेर बडतर्फ दरम्यान, अटकेत असलेला डॉ. नीरज कदम हा कंत्राटी डॉक्टर म्हणून आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात जानेवारी 2018 पासून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. त्याला 50 हजार रुपये मानधनतत्वावर मिळत होते. मात्र, शासकीय औषधसाठा त्याच्या खासगी रुग्णालयात आढळून आल्याचा अहवाल टास्कफोर्स चमूने सादर केल्याने तसंच डॉ. नीरज कदम याच्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याने त्यांची सेवा तत्काळ समाप्त करुन त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बसे यांनी दिले आहे. (बायको गेली माहेरी, मद्यधुंद इसम चढला 350 फूट उंच मनोऱ्यावरी) दुसरीकडे या प्रकरणात बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट न लावल्याची आर्वी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विजय देवळीकर यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी नागपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी कदम रुग्णालयाच्या संचालकाला नोटीस देत तात्काळ खुलासा मागविला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या