महाराष्ट्राचा महासंग्राम : इगतपुरीमध्ये निर्मला गावितांच्या शिवसेना प्रवेशाने समीकरणं बदलली

महाराष्ट्राचा महासंग्राम : इगतपुरीमध्ये निर्मला गावितांच्या शिवसेना प्रवेशाने समीकरणं बदलली

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि राजकीय भूकंप झाला. इगतपुरी - त्र्यंबकेश्वरमधून निर्मला गावित दोनदा निवडून आल्या. आता त्या हॅटट्रिक साधण्यासाठी उत्सुक आहेत.

  • Share this:

इगतपुरी, 17 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि राजकीय भूकंप झाला. इगतपुरी - त्र्यंबकेश्वरमधून निर्मला गावित दोनदा निवडून आल्या. आता त्या हॅटट्रिक साधण्यासाठी उत्सुक आहेत.

इगतपुरीमध्ये गावित घराणं आणि काँग्रेस हे समीकरणच बनलं होतं. त्यांचे वडील माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित हे सलग 9 वेळा नंदुरबारचे खासदार होते. त्यांचाच वारसा चालवत निर्मला गावित यांनी 2009 ची विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. 2014 ची निवडणूकही त्यांनीच जिंकली.

आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला उमेदवार शोधावा लागणार आहे. त्याचवेळी मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे शिवराम झोले, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या आकांक्षांवर पाणी फेरलं गेलं आहे. शिवराम झोले आता बंडाचा झेंडा फडकवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर हेही निवडणूक लढवायला इच्छुक आहेत.

निर्मला गावित हॅटट्रिकच्या तयारीत असल्याने त्यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी शिवसेनेतील नाराज गटाला हाताशी धरून सर्वपक्षीय नेत्यांचा एकच उमेदवार देऊन गावित यांच्या समोर आव्हान उभे करण्याची रणनीती आखली जातेय. आता निर्मला गावित यांना नेमकं कोण आव्हान देणार याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे.

भाजपमध्ये आल्यानंतर उदयनराजेंची 'कॉलर स्टाईल' बंद होणार? पाहा SPECIAL REPORT

2014 च्या विधानसभा निवडणुकीतलं मतदान

निर्मला गावित (काँग्रेस)- 49 हजार 128

शिवराम झोले (शिवसेना) 38 हजार 751

हिरामण खोसकर (राष्ट्रवादी) 21 हजार 746

काशिनाथ मेंगाळ (अपक्ष) 17 हजार 167

चंद्रकांत खाडे (भाजप) 11 हजार 250

महाराष्ट्राचा महासंग्राम : गडचिरोलीमध्ये भाजपचंच वर्चस्व राहणार का?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत इगतपुरी मतदारसंघात मिळालेली मतं

हेमंत गोडसे (शिवसेना) 68 हजार 970

समीर भुजबळ (राष्ट्रवादी) 63 हजार 518

माणिकराव कोकाटे (अपक्ष) 13 हजार 670

पवन पवार (वंचित बहुजन आघाडी)15 हजार 117

===========================================================================================

VIDEO: पुराच्या विळख्यात अडकली शाळा; पत्त्यांसारखी कोसळली इमारत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 04:11 PM IST

ताज्या बातम्या