तुमचा पाल्य बोर्डाची परीक्षा देणार आहे का? तर या 7 गोष्टी विसरू नका

तुमचा पाल्य बोर्डाची परीक्षा देणार आहे का? तर या 7 गोष्टी विसरू नका

तुमचा पाल्य जर कोणत्याही बोर्डाची परीक्षा देणार असेल तर तुमच्या पाल्यासाठी 'न्यूज 18 लोकमत'नं खास टीप्स तयार केल्या आहे. विद्यार्थ्यामधील तणाव दूर करण्यासाठी आमच्या 7 टीप्स तुमच्या मुलांच्या कामी येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जानेवारी:  तुमच्या पाल्य जर यंदा कोणत्याही बोर्डाची परीक्षा देणार असेल तर त्याच्यासाठी आमची ही बातमी अतिशय उपयुक्त आहे. कारण परीक्षेचं विद्यार्थी खुप टेन्शन घेतात. त्यांच्या डोक्यावर परीक्षेचा मोठा तणाव दिसतो. परीक्षेत चांगले मार्क मिळणार की नाही. किंवा आपण पास होणार की नाही याची भीती विद्यार्थ्यांना सतावते. त्यामुळं विद्यार्थी परीक्षेच्या काळात सतत मानसिक तणावात असल्याचं दिसतंय. त्यामुळं विद्यार्थ्यांमधील परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदी 20 जानेवारीला देशभरातील विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहे. विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींचं मार्गदर्शन नक्कीच ऐकावं. मात्र त्याआधी 'न्यूज 18 लोकमत'नं बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास टीम्स तयार केल्या आहेत. दिल्लीतील प्रोफेसर डॉ. रसिक बिहारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही त्यांनी ज्या टीप्स दिल्या त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवतोय.

1. तणाव न घेता करा तयारी

परीक्षा काळात काही विद्यार्थी अभ्यासाचं खुप टेन्शन घेतात. अभ्यासामुळं विद्यार्थी प्रचंड तणावात असल्याचं पाहायला मिळतं. अभ्यासाच्या तणावामुळं काही विद्यार्थी तर खानं-पिणंही सोडून दिवस-रात्र अभ्यास करतात. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. आपला पाल्य वेळेवर झोपतो की नाही तसेच वेळेवर उठतो की नाही याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. कारण वेळेत झोप आणि जेवण झाल्यास सर्व समस्या सुटतात. त्यामुळं विद्यार्थी तणावमुक्त राहणार आणि अभ्यासातही त्यांचं अधिक लक्ष लागेल.

2. वेळेचा चांगला उपयोग करा

सीबीएससीच्या परीक्षेसाठी आता केवळ 35-40 दिवस राहिले आहे. त्यामुळं कमी वेळेत विद्यार्थ्यांना सर्व विषयाची तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी सर्व विषयाचं वेळापत्रक तयार करण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेचा योग्य उपयोग विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे.

3. तब्येतीची काळजी घ्या !

परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी तब्येत चागंली असणं गरजेचं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी खास काळजी घेणं गरजेच आहे. तसेच पुरेशी झोप विद्यार्थ्यांनी घेणं गरजेचं आहे. तसेच जेवण झाल्यानंतर थोडं फिरावं. दुपारी थोडी झोप घ्यावी. त्यानंतर गरम दूध किंवा चहा पिऊन पुन्हा अभ्यास करावा.

4. लक्ष्य निर्धारीत करा

अभ्यास करताना कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचं हे आधीचं ठरवावं.  वेळेतच तो विषय पूर्ण करावा. त्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी वेळ मिळेल. त्यानंतरही वेळ मिळाल्यास ज्या विषयात तुम्ही कच्च आहात त्याची आणखी तयारी करावी.

5. मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिका सोडवा

बोर्ड परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिका सोडवण्याची गरज आहे. मागील वर्षीच्या प्रश्न पत्रिका सोडवल्यास विद्यार्थ्यंना  बोर्ड परीक्षेत चांगली कामगिरी करता येईल. तसेच बोर्डाचा पेपर सोडवण्याचा अनुभव मिळेल.

6. पाठ्य पुस्तकांची निवड करा

परीक्षा देणं ही एक कला आहे. त्यामुळं परीक्षेचा अभ्यास करताना कोणत्या सामृग्रीचा वापर करावा हे आधीच ठरवा. कोणत्या नोट्स, गाइड्स आणि पुस्तकं वाचायची याची निवड करा. आकृती आणि नकाशे असणाऱ्या प्रश्नाची घरीचं चांगली तयारी करा.

7. मोबाईल फोनचा योग्य वापर करा

बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही दिवस मोबाईलचा वापर टाळावा. परीक्षेच्या विषयाशी निगडीत असलेल्या व्हिडीओ आणि माहिती विद्यार्थ्यांनी जमा करावी. विषय अधिक सोपा व्हावा यासाठी सोशल माध्यमांचा वापर करावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 03:40 PM IST

ताज्या बातम्या