चांगले रस्ते हवे असतील तर आयुष्यभर टोल द्या, नितीन गडकरींचं वक्तव्य

चांगले रस्ते हवे असतील तर आयुष्यभर टोल द्या, नितीन गडकरींचं वक्तव्य

हायवे किंवा एक्सप्रेस वे वरचे टोल बंद करा अशी मागणी करत राज्यभरात बरीच आंदोलनं झाली. मुंबई - पुणे एक्सप्रेस वे चा टोल छोट्या गाड्यांसाठी खूपच आहे, अशीही तक्रार प्रवासी करत असतात. पण या टोलच्या प्रश्नावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनीच संसदेमध्ये उत्तर दिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,16 जुलै : हायवे किंवा एक्सप्रेस वे वरचे टोल बंद करा अशी मागणी करत राज्यभरात बरीच आंदोलनं झाली. मुंबई - पुणे एक्सप्रेस वे चा टोल छोट्या गाड्यांसाठी खूपच आहे, अशीही तक्रार प्रवासी करत असतात. पण या टोलच्या प्रश्नावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनीच संसदेमध्ये उत्तर दिलं आहे.

पर्यायी निधी नाही

रस्त्यांवर टोल यंत्रणा सुरूच राहील, असं सांगून ते म्हणाले, 'तुम्हाला चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागेल. रस्तेबांधणीसाठी सरकारकडे पर्यायी निधी नाही. त्यामुळे टोलच्या माध्यमातून येणाऱ्या पैशातूनच ग्रामीण आणि पहाडी भागात रस्ते बनवले जात आहेत. टोल हा आयुष्यभर कमी होऊ शकत नाही. तो कमीजास्त होऊ शकतो पण बंद होणार नाही.' टोलचा जन्मदाता मीच आहे याचीही आठवण त्यांनी करून दिली.

तिने मुलांना कुशीत घेतल्याने मुलं बचावली पण तिचा मात्र जीव गेला

ज्या भागातल्या रस्त्यांवर टोल घेतला जाऊ शकतो तिथे टोल घेतलाच पाहिजे, असं नितीन गडकरींनी सांगितलं. ज्या भागात लोकांची टोल देण्याची क्षमता आहे तिथेच टोल आकारण्यात येतोय, असा खुलासाही त्यांनी केला.

दिल्ली - मुंबई ग्रीन एक्सप्रेस वे

गेल्या 5 वर्षांत 40 हजार किलोमीटरचे हायवे बांधण्यात आले आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. दिल्ली आणि मुंबईमध्ये हे अंतर 12 तासांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने या दोन शहरांसाठी ग्रीन एक्सप्रेस वे च्या प्रकल्पावर सरकार काम करत आहे. हा रस्ता महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात या राज्यांतल्या आदिवासी भागांतून जाईल. त्यामुळे भूसंपादनाचे 16 हजार कोटी रुपये वाचतील, असं त्यांनी सांगितलं.

2014 मध्ये जेव्हा मी रस्तेविकास मंत्रालय हाती घेतलं तेव्हा देशभरातले सुमारे 4 लाख कोटींचे 403 प्रकल्प बंद पडले होते, याचीही आठवण त्यांनी करून दिली.

==================================================================================

VIDEO : डोंगरी इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी नेतमंडळींना केलं हे आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 06:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading