मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : 'नख लावाल तर फाडून टाकू'; राणे पुत्राची केसरकरांवर अत्यंत वाईट शब्दात टीका

Video : 'नख लावाल तर फाडून टाकू'; राणे पुत्राची केसरकरांवर अत्यंत वाईट शब्दात टीका

'...तर त्यांनी ड्रायव्हर म्हणून आमच्याकडे जॉईन व्हावं,'

'...तर त्यांनी ड्रायव्हर म्हणून आमच्याकडे जॉईन व्हावं,'

'...तर त्यांनी ड्रायव्हर म्हणून आमच्याकडे जॉईन व्हावं,'

    सिंधुदुर्ग, 7 ऑगस्ट : नख लावाल तर तुम्हाला फाडून टाकणार असा गर्भित इशारा निलेश राणे यांनी दीपक केसरकरांना दिला आहे. अत्यंत वाईट शब्दात निलेश राणे यांनी केसरकरांवर टीका केली. काही दिवसांपूर्वी दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी आपली भूमिका मांडली. काय म्हणाले निलेश राणे... कोकणात सध्या राणे आणि केसरकर वाद रंगला असून निलेश राणे यांनी केसरकरांना इशारा दिला आहे. जर केसरकरांना राणेंबरोबर काम करण्याची एवढीच हौस असेल तर त्यांनी ड्रायव्हर म्हणून आमच्याकडे जॉईन व्हावं, अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर केसरकर हे स्वतःला खूपच महत्व देत असल्याची टीका निलेश राणेंनी करत मतदारसंघात त्यांची काय औकात आहे, हे आम्हाला माहीत असल्याचे म्हटले. केसरकर यांना मानसिक रोग जडला असल्याचे सांगत राणे यांनी आदित्य ठाकरेंवर ही निशाणा साधला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीसाठी देशभरातल्या जवळपास सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी सहभाग दर्शवला. पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Eknath Shinde, Nilesh rane, Nitesh rane

    पुढील बातम्या