तिसरीत शिकणाऱ्या श्रेयाचं हस्ताक्षर दिग्गज सुलेखनकारालाही लाजवेल!

तिसरीत शिकणाऱ्या श्रेयाचं हस्ताक्षर दिग्गज सुलेखनकारालाही लाजवेल!

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने हस्ताक्षर स्पर्धेत मुलींमध्ये पहिला नंबर पटकावला आहे.

  • Share this:

शिर्डी,6 फेब्रुवारी:अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने हस्ताक्षर स्पर्धेत मुलींमध्ये पहिला नंबर पटकावला आहे. तिचे सुंदर हस्ताक्षर एका दिग्गज सुलेखनकारालाही लाजवेल असंच आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सात्रळ गावातील जिल्हा परिषदेची शाळेत श्रेया सजन तिसरीच्या वर्गात शिकते. येथील जिल्हा परिषदेची शाळा जशी भारी आहे तशीच इथली मुलं देखील एकापेक्षा एक भारी आहेत. या शाळेत तिसरीत शिकणारी श्रेया सजन या मुलीचा हस्ताक्षर स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला आहे. तर मुलींमध्ये ती जिल्ह्यात पहिली आली आहे.

शेरास सव्वाशेर ही कथा तिने कागदावर उतरवली आणि ती खरंच 'सव्वाशेर' ठरली. तिचे वडील गोरक्षनाथ सजन याच शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी मुलीतील कलागुण ती पहिलीला असतानाच ओळखले आणि तिचे हस्ताक्षर सुधारवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. बघता बघता तिने शाळेत, केंद्रात, तालुक्यात आणि आता जिल्ह्यातही पहिला क्रमांक पटकावला आहे. याचा तिचे वडील गोरक्षनाथ सजन (शिक्षक) अभिमान वाटत आहे. मुलीच्या यशाने तिची आई मनिषाला तर आकाश ठेंगणं झालं आहे. सोशल मीडियावर मुलीच्या झालेल्या कौतुकानेच तिची आई खूप आनंदी आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांनीही आता कात टाकली. हसत खेळत शिक्षण मुलांना मिळत असल्याने मुलांच्या कलागुणांनाही वाव मिळतो. श्रेयाला मिळालेल्या यशामुळे शिक्षकांनाही आता नवी उर्जा मिळाली आहे, असे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी सांगितले आहे. प्रार्थना असो, की लेझीम, मैदानी खेळ असो वा कविता अगदी मनापासून मुले यात सहभागी होत असल्याने जिल्हा परिषदेची शाळा मुलांना आपलीशी झाली. आपल्या माय मराठीला जगवण्याचं काम जिल्हा परिषदेचे हे शिक्षक करत आहेत.

First published: February 6, 2020, 5:15 PM IST

ताज्या बातम्या