मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राजेंवर टीका म्हणजे समाजावर टीका, मराठा समन्वयक संभाजीराजेंच्या पाठीशी!

राजेंवर टीका म्हणजे समाजावर टीका, मराठा समन्वयक संभाजीराजेंच्या पाठीशी!

 'जर संभाजीराजेंवर (sambhaji raje chhatrapati) कुणी वैयक्तिक टीका केली तर प्रत्युत्तर दिल जाईल, राजेंवर टीका म्हणजे मराठा समाजावर टीका'

'जर संभाजीराजेंवर (sambhaji raje chhatrapati) कुणी वैयक्तिक टीका केली तर प्रत्युत्तर दिल जाईल, राजेंवर टीका म्हणजे मराठा समाजावर टीका'

'जर संभाजीराजेंवर (sambhaji raje chhatrapati) कुणी वैयक्तिक टीका केली तर प्रत्युत्तर दिल जाईल, राजेंवर टीका म्हणजे मराठा समाजावर टीका'

  कोल्हापूर, 06 जून : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा संघटनांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसंच, जर संभाजीराजेंवर (sambhaji raje chhatrapati) कुणी वैयक्तिक टीका केली तर प्रत्युत्तर दिल जाईल, राजेंवर टीका म्हणजे मराठा समाजावर टीका, मराठे आता शांत बसणार नाही' असा इशाराच कोल्हापूर मराठा समन्वयकांनी दिला आहे. रायगडावर राज्यभिषेक सोहळा आटोपल्यानंतर संभाजीराजे यांनी महाडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा संघटनेचे समन्वयक उपस्थितीत होते. सर्व मराठा संघटनांनी  संभाजीराजेंना पाठिंबा दिला आहे. कोल्हापूरमध्ये सगळे समन्वयक सोबत जाणार आहे, कोल्हापूरमधील आंदोलन यशस्वी करणार असून 36 जिल्ह्यात हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

  मुलींनी आईची हत्या करुन साडीने घेतला गळफास; 4 दिवस तिघींचे मृतदेह घरात पडून

  'पुणे-मुंबईत आंदोलन असणार आहे. दुसरी लाट कोरोना ची आली होती आता तिसरी लाट, मराठ्यांची असेल आज संभाजीराजे नेतृत्व करताहेत. पण कुणाच्या तरी पोटात दुखत आहे. जर त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केली तर प्रत्युत्तर दिलं जाईल. मराठे आता शांत बसणार नाही, राजेंच्या वर टीका म्हणजे मराठा समाजावर टीका आहे, असा इशाराच विनोद साबळे यांनी दिला.

  प्रियकरासाठी तरुणीने मोडला संसार; झोपेच्या गोळ्या देऊन इंजिनिअर पतीचा काढला काटा

  'मी कुणालाही वेठीस धरलं नाही, आमचा कुणाच्या विरोधात लढा नाही. मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी आमची सोपी मागणी आहे. जस्टीस भोसले यांच्या मार्फत मागण्या केल्या होत्या. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्राकडे फक्त महाविकास आघाडी मिळून जाता येणार नाही, तर विरोधी पक्षातील नेत्यांनीही सोबत आलं पाहिजे, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं. 'दोन्ही राजे एकच आहे, यात काहीही वेगळं पण नाही, उदयनराजे यांची सुद्धा मी भेट घेणार आहे', असंही संभाजीराजे म्हणाले.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या