Home /News /maharashtra /

या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे, संभाजी भिडेंचं मोठे विधान

या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे, संभाजी भिडेंचं मोठे विधान

'छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या फोटो नोटांवर छापण्याचे ताकद असलेला देश आपल्याला घडवायचा आहे.'

सांगली, 22 जानेवारी :  'या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्तान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना (Shivsena) आवश्यक आहे. हे माझं वैयक्तिगत मत नसून राष्ट्रीय मत आहे, असं शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji bhide) यांनी ठणकावून सांगितले. सांगलीच्या स्टेशन चौकात बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray birth anniversary) यांच्या जयंती निमित्ताने संभाजी भिडे यांनी शिवसेनेबद्दल भरभरून बोलत होते. 'बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती, संपूर्ण देशात शिवसेना वाढवावी अशी आकांक्षा त्यांची होती. त्यांची ही इच्छा आकांक्षा पुर्ण करण्याचे काम हयात असलेल्या लोकांनी करणे गरजेचं आहे, असं संभाजी भिडे म्हणाले. तसंच, 'नामकरण होईल पण कामाचे काय आहे. या सांगली शहरात 200 ते 250 शिवसेनेच्या शाखा का नाहीत. याचे तीव्र दु:ख आहे. याचा विचार करून आपण सर्वांनी काम केले पाहिजे. हेच खरे नामाकरण ठरणार आहे. हा प्रवाह अखंड चालू राहिला पाहिजे' अशी इच्छा भिडे यांनी बोलून दाखवली. 'हा संपूर्ण देश हिंदुत्वाच्या धारेखाली आणायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या फोटो नोटांवर छापण्याचे ताकद असलेला देश आपल्याला घडवायचा आहे. हे लक्षात ठेवून काम आपल्याला करायचे आहे. हे काम शिवसेनेच्या कार्यातच होणे शक्य आहे, हे माझे ठाम मत आहे' असंही भिडे गुरुजी म्हणाले. बास्केटबॉल खेळता खेळता नेटवर लटकला आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO 'या देशाला शिवसेना अत्यंत गरजेची आहे. ज्या प्रकारे अन्न, पाणी आणि निवार मनुष्याला गरजेचा आहे, त्यामुळे या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्तान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन कामावर आपण तुटून पडले पाहिजे, काम वाढवूया, लोकांमध्ये जाऊया, हे माझं वैयक्तिगत मत नाहीतर राष्ट्रीय मत आहे, असंही संभाजी भिडे यांनी ठणकावून सांगितले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या