पक्ष सांगेल तेव्हा दिल्लीत जाण्याची तयारी; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

महाजनादेश यात्रेवर निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी आज गुगली टाकत सगळ्यांनाच धक्का दिला. दिल्लीला जाण्याचे संकेत देत त्यांनी नव्या राजकीय चर्चेला तोंड फोडलंय.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 06:01 PM IST

पक्ष सांगेल तेव्हा दिल्लीत जाण्याची तयारी; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

विवेक कुलकर्णी, धुळे 23 ऑगस्ट : राज्यात देवेंद्र आणि दिल्लीत नरेंद्र अशी घोषणा राज्यात कायम दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आपलं स्थान मजबूत केलंय असं मानलं जातं. राज्या ज्या मोजक्या मुख्यमंत्र्यांना सलग पाच वर्ष पूर्ण करायला मिळाली अशा मोजक्या नेत्यांचामध्ये त्यांचा समावेश होतो. महाजनादेश यात्रेवर निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी आज गुगली टाकत सगळ्यांनाच धक्का दिला. मी काही काळ राज्यात आहे, मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जाण्याची तयारी आहे असं त्यांनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या Exclusiveमुलाखतीत सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चेला उधाण आलंय.

उदयनराजे पक्षात आले तर आनंदच

मुख्यमंत्री म्हणाले, आमची परीक्षक जनता आहे. महाजनादेशाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आम्ही अपेक्षा पूर्ण करु याचा लोकांना विश्वास वाटतो. आमच्या यात्रेनंतर इतर पक्षांनी यात्रा काढावी वाटली. विरोधकांच्या यात्रांना प्रतिसाद नाही उदयनराजे पक्षात आले तर आनंद, आम्ही त्यांचे स्वागत करु.

हेही वाचा - ABVP च्या कार्यकर्त्यांनी सुशीलकुमार शिंदेंच्या पोस्टरला फासले काळे, 'त्या' घटनेचे पडसाद

पूरग्रस्त भागातली जनता पाठिशी

Loading...

पूरग्रस्त भागासाठी मोठा निधी देण्यात आलाय.अमित शाहांशी पूरग्रस्त भागाबद्दल चर्चा केली. पूरग्रस्त भागातील राजकारणाची चर्चा उथळ आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा इथली  भागातील जनता आमच्या पाठीशी आहे.पूराचा विधानसभा निवडणूक निकालावर परिणाम होणार नाही  असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार

सहकार नाही तर स्वाहाकार झालाय. या प्रकरणाबद्दल बराच काळ चौकशी सुरु होती. कोर्टाच्या निकालानुसार आम्ही कारवाई करु असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज ठाकरे

राज ठाकरे यांची ईडीची चौकशी राजकीयदृष्ट्या नाहीये. राज ठाकरे सगळीकडे हरलेत. जे राजकीयदृष्या हरलेत त्यांची अशी मुद्दाम चौकशी करुन काय फायदा? आपल्यावर काही आलं तर ते राजकीय असं म्हणतात.

लोकसभेत राज ठाकरे यांच्या भाषणानं कोणताही परिणाम झाला नाही आता काय होणार? राज ठाकरेंनी जिथे जिथे सभा घेतल्या तिथे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झालेत.

हेही वाचा - दिवाळखोरीत गेलेल्या 'जेट'च्या नरेश गोयल यांच्या घर-ऑफिसवर EDचे छापे

राणेंना त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करायचा

राज ठाकरे यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेलं मत त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. माझी आणि शरद पवार यांनी कामाची पद्धत वेगळी.  मला नारायण राणेंनी पुस्तक प्रकाशनास बोलावलं होतं. पण त्यांनी सांगितलेल्या वेळेत मला जाणं शक्य झालं नाही. राणे आमच्या सोबत आहेत.

राणेंना राज्यसभेत जाण्याचा निर्णय त्यांच्याशी चर्चा करुन घेतला. नारायण राणेंना आपला पक्ष भाजपात विलिन करायचा आहे. सर्व घटक पक्षांना आम्ही सामावून घेऊ. घटक पक्षांना जागा दिल्यानंतर आम्ही आमचं जागावाटप करु. सध्या जिंकलेल्या जागा भाजप शिवसेना कायम ठेवणार. या वेळचा आमचा विजय हा महाराष्ट्राला अभूतपूर्व विजय असेल.

हेही वाचा -  फॉर्म्युला फसणार? 'या' गोष्टीवरून सेना- भाजप युतीत निर्माण होऊ शकतो गंभीर पेच

आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातले उभरते नेते आहेत, त्यांच्यात नेतृत्व गुण विकसीत होत आहेत. आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री पद मिळणार याबद्दल बोलताना ते म्हणाले, नेतृत्वाला खूश करण्यासाठी काही लोक अशा गोष्टी बोलत असतात. शिवसेनेत उद्धव ठाकरे काय बोलतात यालाच मी  गांभीर्यानं घेतो

युतीनंतर ओढा वंचितकडे

राज्यात जनतेचा ओढा आमच्या खालोखाल वंचितकडेच आहे, काँग्रेस राष्ट्रवादीकडे नाहीये असं मतही त्यांनी व्यक्त केलं. महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा उर्वरित पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात असणार आहे. पूरग्रस्त भागासाठी वेगळी यात्रा असेल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...