Home /News /maharashtra /

भाजपच्या त्या नेत्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप होईल; आघाडी सरकारमधील महिला मंत्र्याचा दावा

भाजपच्या त्या नेत्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप होईल; आघाडी सरकारमधील महिला मंत्र्याचा दावा

संबित पात्रा म्हणाले की जर तुम्ही परदेशात नाही तर देशात आहात..तर उद्या राजस्थानबाबत एक व्हिडीओ जारी करावा. तुम्हाला आव्हान देत आहे. जर ते देशात असते तर त्यांनी सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यासोबत बसून चर्चा सुरू असल्याचं सांगायला हवं होतं.

सध्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने विचारलं जात आहे की महाराष्ट्रात काय होईल?

    मुंबई, 16 जुलै : राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादळ सर्वत्र चर्च आहे. त्यात महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र सरकार स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलं असून उलटपक्षी भाजपचे 105 पैकी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. सध्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने विचारलं जात आहे की महाराष्ट्रात काय होईल? मात्र मला सर्वांना सांगायचं आहे की राज्यातलं सरकार स्थिर आहे. कुणी हे स्थिर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. हे वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांप्रमाणे रझा अकादमीची पाठराखण करतात का? नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे.आमचे कुणी फुटणार नाहीत, उलट 105 पैकी काही लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप होईल, असा इशारा त्यांनी वेळी दिला आहे. हे वाचा-ठाकरे सरकारची मोर्चेबांधणी सुरू, मराठा आरक्षणाबाबत 'वर्षा'वर महत्त्वपूर्ण चर्चा यापूर्वीही महाआघाडीचे सरकारच्या नेत्यांनी राजस्थान राजकीय परिस्थिती बिघडली असली तरी महाराष्ट्रातील सरकार हे स्थिर असल्याचं वक्तव्य केलं होतं. आज भाजप नेते नारायण राणे यांनी सामना वृत्तपत्रातून पूर्वी शरद पवारांविरोधात आलेल्या बातम्यांचा उल्लेख केला. तर यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत हे नोकरी जरी सामनात करीत असले तरी ते काम शरद पवारांचं करतात असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Yashomati thakur

    पुढील बातम्या