गोविंद वाकडे, प्रतिनिधी
15 नोव्हेंबर : मराठा आरक्षणाच्या माध्यमातून काही आर्थिक बोझा पडणार असेल तर अर्थमंत्री म्हणून मी तयार आहे असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. तसंच आरक्षण देण्याबाबत सरकारची नियत साफ़ आहे. आरक्षण न्यायलयात टिकेल असा विश्वासही मुनगंटीवारांनी व्यक्त केला.
सुधीर मुनगंटीवार आज पिंपरी चिंचवडमध्ये होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राजीनामा मागण्याच्या प्रश्नावर पुन्हा एकदा उत्तर दिले.
आपल्या पदाचा राजीनामा मनेका गांधी यांनी मागितला म्हणून राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. याबाबत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा निर्णय घेतील,उद्या त्यांनी माझा राजीनामा मागायचा आणि त्यानंतर मी त्यांचा राजीनामा मागायचा हे काही अपेक्षित नाही असं मुनगंटीवार म्हणाले. तर यवतमाळमध्ये दिसलेली वाघाची बछडे अवनी वाघिणीची असल्याची शक्यता व्यक्त करत पुढील कारवाई सुरू असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
सरकार म्हणून काही मर्यादा नक्की आहेत, पण शेतकऱ्यांच्या किंवा विविध समुहातील घटकासाठी आरक्षणाच्या माध्यमातून काही आर्थिक बोझा पडणार असेल तर अर्थमंत्री म्हणून मी तयार आहे. आरक्षण देण्याबाबत सरकारची नियत साफ़ आहे. आरक्षण न्यायलयात टिकेल आणि मराठा समाजाबरोबरच ज्यांना आरक्षण हवंय त्यांच्यावर अन्याय होणार नाही सरकार ह्याची काळजी घेतंय असं मुनगंटीवार म्हणाले.
=================