छेड काढण्याचा प्रयत्न केला तर अद्दल घडवा, नांगरे पाटलांसमोर राणी मुखर्जीने दिला तरुणींना सल्ला

छेड काढण्याचा प्रयत्न केला तर अद्दल घडवा, नांगरे पाटलांसमोर राणी मुखर्जीने दिला तरुणींना सल्ला

'प्रत्येक शाळा महाविद्यालयांमधे तरुणींना स्वरक्षणाचे धडे देणं आवश्यक आहे. तरुणींकडे कुणी वाकड्या नजरेने पाहायला नको.'

  • Share this:

प्रशांत बाग, नाशिक 16 डिसेंबर : कोणी तुमची छेड काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर तुटुन पडा आणि त्याला अद्दल घडवत खेचत पोलीस ठाण्यात आणण्याची धमक ठेवा असा सल्ला मर्दानी अभिनेत्री राणी मुखर्जी हिने नाशिकच्या तरुणींना दिला. निमित्त होतं ते नाशिक पोलीसांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महिला सुरक्षेविषयक परिसंवादाचं. प्रत्येक शाळा महाविद्यालयांमधे तरुणींना स्वरक्षणाचे धडे देणं आवश्यक असल्याचं मत देखिल राणी मुखर्जी हिने व्यक्त केलं. "say no to women violence" हा महिला सुरक्षेसंदर्भातल्या परिसंवाद कार्यक्रमाचं आयोजन नाशिक पोलीसांच्या वतीनं करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्री राणी मुखर्जी, मुक्ता बर्वे, अभिनेते प्रविण तोरडे यांच्यासह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री राणी मुखर्जी हिने आजच्या तरणींना मर्दानी प्रमाणे धडाकेबाज होण्याचा सल्ला दिला.

फडणवीसांच्या या योजनेला मात्र उद्धव ठाकरे राज्यभर पोहोचविणार

तर अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने देखिल आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. मला कायदा कळत नाही, मला कलम कळत नाहीत पण हैद्राबाद घटनेनंतर पोलीसांनी जे केलं ते एकुन मला आनंद झाला असं मत मुक्ता बर्वे हिने व्यक्त केलंय. दरम्यान, सरकारकडुन काही अपेक्षा आहेत का असं विचारल्यानंतर, सरकारकडून आपल्याला काहीच अपेक्षा नाहीत. सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यापेक्षा त्यांच्या जमिनी त्यांच्याकडेच राहतील याकडे लक्ष द्यायला हवं असं सडेतोड मत अभिनेते प्रविण तोरडे यांनी व्यक्त केलं.

लग्नानंतर पहिल्यांदाच साई दर्शनाला आलेल्या राणी मुखर्जीला अश्रू अनावर

तर नाशिकमधे आता निर्भया सेल ची स्थापना करण्यात आली असुन या माध्यमातून शहरातील महिला आणि तरुणींसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्न नाशिक पोलीस करणार असल्याचं पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन राणी मुखर्जी, मुक्ता बर्वे यांनी उपस्थित विद्यार्थीनींच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिले. तर नायब राज्यपाल किरण बेदी यांनी देखिल व्हिडीयो संदेशाच्या माध्यमातुन नाशिक पोलीसांच्या या उपक्रमचं कौतुक केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2019 08:45 PM IST

ताज्या बातम्या