सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीच्या सेनेला 'या' अटी, तर काँग्रेस म्हणते...

सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीच्या सेनेला 'या' अटी, तर काँग्रेस म्हणते...

शिवसेना-राष्ट्रवादी यांचे मिळून सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्री 5 वर्षांसाठी असेल. तर दोन उपमुख्यमंत्री असतील पण यासाठी काही अटी सेनेला असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 05 नोव्हेंबर : सेना-भाजप यांच्यातील सत्ता संघर्षाचा तणाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. एकीकडे भाजप सेनेसोबत मुख्यमंत्रीपदावर चर्चा करण्यास तयार नाही तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेनं 50-50 फॉर्म्युल्यावरच चर्चा होईल असं म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली. सेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन केलं तर त्याला काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल पण त्यासाठी आधी शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतर पुन्हा सोनिया गांधीशी शरद पवार चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याआधी राष्ट्रवादीच्या काही अटी असतील. त्यामध्ये सेनेला राज्यात राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायचे असेल तर सेनेच्या एकमेव मंत्र्याला केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतरच राष्ट्रवादी सेनेसोबत काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा विचार करेल. शिवसेनेने NDA सोबतचे संबंध तोडावे लागतील. सेनेनं ही अट मान्य केल्यास त्यांना 5 वर्षे मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला देशव्यापी राजकारण करायचं असल्याने शिवसेनेने कुठल्या मुद्यावर जहाल भूमिका घेऊ नये याची काळजी शरद पवारांनी घ्यावी असंही सोनियांनी सूचविल्याची माहिती आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देईल मात्र सरकारमध्ये सामील होणार नाही असंही काँग्रेसने पवारंना सांगितल्याची माहिती 'News18इंडियाला'मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला सध्यातरी मुख्यमंत्रीपद नको असल्याचं म्हटलं जात आहे. सनेचा 5 वर्षे मुख्यमंत्रीपद आणि 2 उपमुख्यमंत्री असा प्रस्तावही यामध्ये असेल. दोनपैकी एक सेनेचा एक राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असेल. यामध्ये जर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला तर बदल होऊ शकतो. अद्याप तरी त्यांनी आपण राज्याच्या राजकारणात उतरणार नसल्याचंच म्हटलं आहे. मात्र, अजुनही याबाबत सेनेकडून कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादीकडे आलेला नाही.

सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर पवार म्हणाले, मी सोनियांना महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीची माहिती दिली. राज्यात सध्या अस्थिरता आहे. त्या पार्श्वभूमीवर  आम्ही सगळी चर्चा केली. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला किंवा आम्ही त्यांना कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. राज्यात भाजपच्या विरोधी वातावरण आहे. शिवसेनेने 170 चा नंबर कुठून आणला ते माहित नाही. आमच्याकडे सत्ता बनविण्यासाठी संख्याबळ नाही. संजय राऊत आमच्याकडे 170चं सख्याबळ असल्याचं सांगत आहेत त्यावर बोलताना पवार म्हणाले त्यांच्याबरोबर बरोबर भाजपचा मोठा गट असावा. मुंबईत मंगळवारी पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करणार असून त्यानंतर पुन्हा सोनियांशी भेटणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात होणार आहे.

गडकरी-फडणवीस आमच्यासाठी एकच, संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 11:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading