मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शरद पवार एनडीएमध्ये आले तर कॅबिनेट मंत्रिपदासाठी प्रयत्न करेन -रामदास आठवले

शरद पवार एनडीएमध्ये आले तर कॅबिनेट मंत्रिपदासाठी प्रयत्न करेन -रामदास आठवले

काँग्रेसच्या काळात सोनिया गांधींनी जर तेव्हा विचार केला असता तर शरद पवार पंतप्रधान होऊ शकले असते पण तेव्हा तसं झालं नाही

काँग्रेसच्या काळात सोनिया गांधींनी जर तेव्हा विचार केला असता तर शरद पवार पंतप्रधान होऊ शकले असते पण तेव्हा तसं झालं नाही

काँग्रेसच्या काळात सोनिया गांधींनी जर तेव्हा विचार केला असता तर शरद पवार पंतप्रधान होऊ शकले असते पण तेव्हा तसं झालं नाही

  मुंबई,24 मार्च : सोनिया गांधींनी तेव्हा विचार केला असता तर शरद पवार पंतप्रधान झाले असते पण आता तशी शक्यता नाही. जर शरद पवार एनडीएमध्ये आले तर त्यांच्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करेन अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांची खिल्ली उडवली. तसंच उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतच लढवं असं आवाहनही आठवलेंनी केलं.

  रामदास आठवले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार भावी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहे का ?, या प्रश्नावर आपल्या शैलीत उत्तर दिलं. रामदास आठवले म्हणाले, शरद पवार हे राज्यातील आदरणीय राजकीय व्यक्तिमत्व आहे. आता तिसऱ्या आघाडीची चर्चा आहे. पवार यांचं नाव पंतप्रधानपदासाठी जरी पुढे येत असलं तरी मराठी माणूस पंतप्रधान होईल अशी शक्यता नाही.

  आठवले पुढे म्हणाले, "काँग्रेसच्या काळात सोनिया गांधींनी जर तेव्हा विचार केला असता तर शरद पवार पंतप्रधान होऊ शकले असते पण तेव्हा तसं झालं नाही, शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले."

  जर शरद पवार एनडीएमध्ये आले तर त्यांना कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन असा टोला आठवलेंनी लगावला.

  "राज ठाकरे माझे मित्र, मला माहितीये त्यांचं चित्र"

  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना मोदीमुक्त भारत करू शकत नाही. आता मी काही राज ठाकरे मुक्त महाराष्ट्र झाला असं म्हणू शकत नाही. कारण ते माझे चांगले मित्र आहे, म्हणून मला त्यांचं चित्र माहिती आहे असा टोलाही आठवलेंनी राज ठाकरेंना लगावला.

  "साहेबांचा आदेश पाळा"

  माझं शिवसेनेला आवाहन आहे की त्यांनी भाजप सोबत लढावं. बाळासाहेबांचा उद्धव ठाकरेंना भाजपबरोबर राहण्याचा आदेश होता तो धुडकावून तुम्ही एकटे लढू नये. त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होईल असा सल्लाही आठवलेंनी उद्धव ठाकरेंना दिला.

  First published:

  Tags: Ramdas athwale, Sharad pawar