Home /News /maharashtra /

प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला फटका, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला फटका, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

संभाजीराजे (Sambhaji raje) आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या भेटीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अमरावती, 12 जून : मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मुद्यावरून खासदार संभाजीराजे (Sambhaji raje) आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या भेटीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 'जर प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे एकत्र आले तर याचा फटका पेशवाईलाच बसणार आहे' अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर केली. नाना पटोले सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना कोरोनाची परिस्थिती आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज आंदोलन करत आहे. संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. संभाजीराजे यांनी वेगळा पक्ष काढणार असल्याची चर्चा आहे. पण येत्या निवडणुकीत वंचित आघाडी व संभाजीराजे एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल. शिवशाहीला बसणार नाही', अशी टीका  नाना पटोले यांनी केली. राजकुमार हिरानींचा दावा ठरला खोटा; अनुष्का शर्माचा 13 वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल 'कोरोनानंतर उद्भवणार्‍या आजारावर केंद्र सरकारकडे इंजेक्शन उपलब्ध असतानाही ते राज्याला देत नाही. आज राज्यात 50 हजार पोस्ट कोविडचे रुग्न असताना चार ते पाच हजार इंजेक्शन देतात व बाहेर या इंजेक्शनची  काळा बाजारी केली जाते. यामुळे अनेकांना आपले जीव तर काहींना आपले अवयव गमवावे लागले आहेत. मात्र केंद्र सरकारला सामान्य माणसाची काही घेणे देणे नाही ते सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळ करत असल्याची घणाघाती टीकाही नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Congress, Nana Patole, काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष

पुढील बातम्या