मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

"मराठी माणूस पंतप्रधान झाला तर अभिमान; उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास सोनिया, पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं"

"मराठी माणूस पंतप्रधान झाला तर अभिमान; उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास सोनिया, पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं"

Pravin Darekar: उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान झाल्यास मराठी माणूस म्हणून अभिमान असेल असं वक्तव्य प्रविण दरेकरांनी केलं आहे.

  • Published by:  Sunil Desale

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 29 मे: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पंतप्रधान (Prime Minister) झाल्यास मराठी माणूस म्हणून मला अभिमान असेल असं वक्तव्य राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे. शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान (Harshal Pradhan) यांनी लिहिलेल्या एका लेखात उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान व्हावेत ही जनतेची इच्छा असं म्हटलं होतं यावर प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हर्षल प्रधान यांनी लिहिलेल्या लेखावर भाष्य करताना प्रविण दरेकर म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर अभिमान आहे.

मात्र त्यासाठी संख्याबळ असावे लागते. तर सोनिया गांधी आणि शरद पवार हे उपपंतप्रधान होऊन हाताखाली काम करतील असा टोलाही दरेकरांनी लगावला आहे. प्रवीण दरेकर हे बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे आमदार श्वेता महाले यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

''...नाहीतर मी थांबलेली आंदोलन पुन्हा सुरू करेन'' दरेकरांचा सरकारला इशारा

हर्षल प्रधान यांनी काय म्हटलं होतं लेखात?

हर्षल प्रधान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचं कौतुक करत म्हटलं होतं की, मुख्यमंत्री संवेदनशील आणि विनम्र नेत्यांपैकी एक नेते आहेत. ते असे एकमेव मुख्यमंत्री आहेत जे सातत्याने जनतेसोबत संवाद साधत आहेत. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिमा केवळ जनतेच्या मनात नाही तर सर्वांच्याच मनात निर्माण केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे पंतप्रधान व्हावेत ही जनतेची इच्छा आहे.

संजय राऊतांवर दरेकरांची टीका

संजय राऊत हे उठले की केंद्राच्या नावाने शिमगा करतात. त्यांना दुसरे कामच नाहीये. आपलं अपयश झाकण्यासाठी संजय राऊत हे सातत्याने केंद्रावर टीका करतात. तसेच भाजप, माझ्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करतात.

First published:

Tags: Pravin darekar, Sharad pawar, Uddhav thackeray