Home /News /maharashtra /

छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट, ''शिवसेना- काँग्रेस सोडली नसती तर आज मुख्यमंत्री झालो असतो''

छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट, ''शिवसेना- काँग्रेस सोडली नसती तर आज मुख्यमंत्री झालो असतो''

छगन भुजबळांनी एक मोठा गौप्यस्फोट केला असून आपल्या मनातली खंतही व्यक्त केली आहे.

    नाशिक, 15 ऑक्टोबर: आज अन्न व नागरी पुरवठामंत्री (Food and Civil Supplies Minister) आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री (Nashik District Guardian) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा वाढदिवस आहे. आज त्यांनी 75 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. यानिमित्तानं छगन भुजबळांनी एक मोठा गौप्यस्फोट केला असून आपल्या मनातली खंतही व्यक्त केली आहे. मी शिवसेना आणि काँग्रेस सोडली नसती तर आज मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो, अशी भावना छगन भुजबळांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. मटासोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्यांच्या सभेत आपण भाषणं दिली, ते आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री झाले आहेत. माझे अनेक सहकारी पुढे गेले. मी मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री होऊ शकलो नाही. त्याबद्दल आता खंत व्यक्त करण्यात अर्थ नाही, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. तसंच मी शिवसेना किंवा काँग्रेस सोडली नसती तर आज नक्कीच मुख्यमंत्री झालो असतो, अशी भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. हेही वाचा- मुंबई: आईवर अत्याचार करणाऱ्या बापाला भयंकर शिक्षा; डोक्यात हातोडा घालून केला खेळ खल्लास  छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट काँग्रेस नेतृत्त्वानं एकेकाळी संपर्क करुन आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे. मात्र ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता,असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना सोडतानाचा काळ सर्वांत कठीण होता, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. पण ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी मला शिवसेना सोडावी लागली, असंही त्यांनी बोलून दाखवलं आहे. हेही वाचा- सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांचा लष्करावर हल्ला, JCO सहित 2 जवान शहीद शिवसेना सोडण्याचे तोटेही मला सहन करावे लागले. शिवसेना सोडली नसती, तर शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री मीच राहिलो असतो. मातोश्रीवर गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मला हे सांगितले होते, असंही भुजबळांनी सांगितलं. दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची संधी होती- भुजबळ मुख्यमंत्रीपदापेक्षाही ओबीसींना आरक्षण मिळवून दिले, हा माझ्यासाठी मोठा आनंद आहे, असं ते म्हणाले. शरद पवारांसोबत काँग्रेस सोडतानाही दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदासाठीची संधी चालून आली होती. तेव्हा विलासराव देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाने मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, हे देखील भुजबळांनी सांगितलं आहे. हेही वाचा- IPL 2021 Final: KKR घेणार मोठा निर्णय, कॅप्टन मॉर्गनची होणार टीममधून हकालपट्टी!  सोनिया गांधींचे सचिव व्ही. जॉर्ज यांच्यासह शीला दीक्षित, राजेश पायलट यांनी माझ्याशी संपर्क करून परत येण्याची सूचनाही केली. मात्र मी पवारांसोबतच कायम राहायचे ठरविले, असं छगन भुजबळ म्हणालेत. भुजबळांनी काढली माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांची आठवण छगन भुजबळ म्हणाले, व्हीपी सिंग यांनी मला दिल्लीत ओबीसींचा राष्ट्रीय नेता व्हायची विनंती केली होती. मात्र आपण ती फेटाळली होती. माझी निष्ठा पवारांशी आहे. त्यांनी मला आजपर्यंत मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून खूप काही दिलं आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेण्याचा मान दिला आहे, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Chagan bhujbal, NCP, Shivsena

    पुढील बातम्या