मी आत्महत्या केली तर तुमचे व्हिडिओ बाहेर येतील, रावसाहेब दानवेंच्या जावायाची थेट धमकी

मी आत्महत्या केली तर तुमचे व्हिडिओ बाहेर येतील, रावसाहेब दानवेंच्या जावायाची थेट धमकी

हर्षवर्धन जाधव यांनी उघडपणे आपले सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 30 मे :  कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड  केला आहे. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आणला आहे. जाधव यांनी उघडपणे आपले सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

हेही वाचा-वसईत धक्कादायक घटना, मंदिराच्या पुजाऱ्याला तरुणांची मारहाण

'मी स्वबळावर निवडणूक लढलो होतो आणि निवडून आलो होतो. तुम्ही नरेंद्र मोदींचा चेहरा फोटोवरून बाजूला काढून निवडणूक लढवून दाखवा. भाजप पक्ष सोडून निवडणूक लढवून दाखवा, तुम्हाला तुमची जागा कळेल, अशी टीका हर्षवर्धन जाधव यांनी केली.

'तुम्हाला वाटतं मी फार फडफड करतोय. याला कुठेही धरून कापून टाकू, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे  छक्के पंजे  असलेले अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहे. हे सर्व व्हिडिओ बाहेर काढले.  हे व्हिडिओ वकिलांना पाठवले आहे', असा इशाराच जाधव यांनी दानवेंना दिला.

'या व्हिडिओमुळे माझ्या जीविताला काही झाले किंवा तुम्ही केंद्रीय मंत्री असल्यामुळे माझ्यावर पोलीस सोडले तर मी आत्महत्या करेल. माझ्या आत्महत्येनंतर हे सर्व व्हिडिओ बाहेर येतील. मी आत्महत्या केली तर तुमचे बारा वाजतील. माझ्या आत्महत्येला रावसाहेब दानवे जबाबदार राहतील', असा थेट आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला.

विशेष म्हणजे, 23 मे रोजी हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचा निर्णय जाहीर केला होता. हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.

हेही वाचा-टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करत आहे मोदी सरकार? वाचा सविस्तर

'सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक जण विविध प्रकारचे छंद जोपासत आहेत. मीही आध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. आपण विनाकारण काही गोष्टीमागे पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत यांची जाणीव झाली आणि त्यातून राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केलं होतं.

त्याचबरोबर, 'पत्नी संजना जाधव ही राजकारणातील त्यांची उत्तराधिकारी  असेल. यापुढे राजकारणाशी संबंधित सगळे निर्णय तिच घेईल.   प्रत्येक घरात काही कुरबुरी होत असतात, तशा आमच्याही घरात झाल्या. मी खंबीरपणे संजना जाधव यांच्या पाठीशी उभा राहिल' असंही जाधव म्हणाले होते.   हर्षवर्धन जाधव सध्या महाबळेश्वरला एका मेडिटेशन सेंटरमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 30, 2020, 10:38 AM IST
Tags:

ताज्या बातम्या