सरकार स्थापन झालं नाही तर राज्यपालांकडे आहेत 3 पर्याय

सरकार स्थापन झालं नाही तर राज्यपालांकडे आहेत 3 पर्याय

शिवसेना-भाजप यांच्यातील संघर्ष मिटला नाही आणि राज्यात सरकार स्थापन होऊ शकत नसेल तर राज्यपालांकडे 3 पर्याय आहेत.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर : राज्यातील 2014 च्या विधानसभेचा कार्यकाळ शुक्रवारी संपणार आहे. तोपर्यंत नव्या सरकार स्थापनेची चिन्हे अजुनही दिसत नाहीत. महायुतीला बहुमत मिळालं मात्र सत्ता स्थापनेचा पेच सेना-भाजपमध्ये निर्माण झाला आहे. या दोन्हींमध्ये कोणतीच चर्चा यशस्वी झाली नाही तर पुढे काय करायचं हे सर्व राज्यपालांच्या हाती असणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सरकार स्थापन न झाल्यास राज्यपाल काय निर्णय घेणार याचीही उत्सुकता सर्वांना आहे. राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडे राष्ट्रपती राजवटीसह तीन पर्याय असतील.

कोणत्याही राजकीय पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही तर राज्यपाल सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेतील. त्यापैकी एखाद्या पक्षाच्या विधीमंडळ नेत्याला सरकार स्थापनेचं आमंत्रण देतील. यामध्ये शक्यतो सर्वात मोठ्या पक्षाला सरकास स्थापनेसाठी आमंत्रण दिलं जातं. यानंतर नव्या सरकारला बहुमत देण्यासाठी 30 दिवसांचा वेळ दिला जाऊ शकतो.

राज्यपाल नव्या सरकार स्थापनेसाठी आणखी वेळ वाढवून देऊ शकतात. अशा परिस्थिती सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री करता येऊ शकतं. तसेच नव्या सरकारच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणतेही धोरणात्मक आणि आर्थिक अधिकार नसतात. विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असला तरी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांसाठी मर्यादा नाही. पण राज्यातील परिस्थिती पाहता राज्यपाल हा पर्याय निवडण्याची शक्यता कमी आहे.

वाचा : महाराष्ट्राची सत्तास्थापना नाही तर 'हा' मुद्दा अमित शहांच्या टार्गेटवर

विधिमंडळ पक्षांची बैठक घेऊन राज्यपाल सभागृह नेत्याची निवड करण्यास सांगू शकतात. त्यानंतर सभागृह नेत्याला मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते. मात्र अशा प्रकारच्या सरकारसमोर विश्वास ठराव जिंकण्याचं आव्हान असतं. कारण सभागृह नेता निवडताना पर्याय असतील पण बहुमतावेळी फक्त सरकारसोबत असणे, विरोधीपक्षात बसणे किंवा बाहेर राहून पाठिंबा देणे या तीनच गोष्टी होऊ शकतात.

सरकार स्थापन न झाल्यास सर्वात शेवटी राज्यपालांजवळ राष्ट्रपती राजवटीचा पर्याय आहे. विधानसबा निलंबित करत केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी प्रस्ताव दिला जाऊ शकतो. गेल्या काही दिवसांत राज्यपालांनी महाधिवक्ता आणि मुख्य सचिवांसोबत बैठक घेतल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रावर अस्थिरतेची टांगती तलवार, राष्ट्रपती राजवट लागू झाली तर काय होणार?

वकिलांनी महिला पोलिसावरही केला हल्ला, पाठलाग करून केली मारहाण, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 01:42 PM IST

ताज्या बातम्या