Home /News /maharashtra /

Shivsena Eknath Shinde : निवडणुका टळल्या तर... एकनाथ शिंदेंच्या गटाला यातून काय मिळणार

Shivsena Eknath Shinde : निवडणुका टळल्या तर... एकनाथ शिंदेंच्या गटाला यातून काय मिळणार

शिवसेनेतील (shiv sena) महत्वाचे नेते एकनाथ शिंदेंनी (eknath shinde) ठाकरे सरकारला (thackeray government) मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

  मुंबई, 22 जून : शिवसेनेतील (shiv sena) महत्वाचे नेते एकनाथ शिंदेंनी (eknath shinde) ठाकरे सरकारला (thackeray government) मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. 35 च्या आसपास आमदार फोडून आणखीही काही आमदार शिंदेंच्या संपर्कात असून त्यांच्यासह स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी एकनाथ शिंदे (eknath shinde in guwahati) यांनी केली आहे. शिवसेनेचे 55 आमदार आहेत. पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार (party action law) दोन तृतीयांश म्हणजे 37 आमदारांनी पक्ष सोडला तर त्यांच्या आमदारकीला धोका नसल्याचे कायदा सांगतो. याच नियमाचा आधार घेत शिंदे आमदारांचा स्वतंत्र गट तयार करून.

  शिंदेंचा गट बहुमत सिद्ध करून भाजपला पाठिंबा देईल. भाजपचे 106 व 28 समर्थक आमदार आणि शिंदेंचा गट मिळून सत्ता स्थापन करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बदल्यात शिंदेना उपमुख्यमंत्रिपद व त्यांच्या गटाला ९ ते १० मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती शिंदेंच्या निकटवर्तीयांनी मिळत आहे.

  हे ही वाचा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, आज शेवटची मंत्रिमंडळाची बैठक?

  ...अन्यथा मध्यावधीचा लागण्याची शक्यता

  एकनाथ शिंदे गट स्थापन करू शकले नाही तर त्यांच्यासह समर्थक आमदार राजीनामे देतील. त्यामुळे ठाकरे सरकार पायउतार होईल व राष्ट्रपती राजवट लागू होईल. त्यानंतर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात.

  विधानसभेचे सध्याचे बलाबल संख्याबळ 287 आहे यामध्ये शिवसेना - 55, भाजप-106, राष्ट्रवादी काँग्रेस- 54, काँग्रेस 44, अपक्ष 14, शेकाप 01, सपा 01, माकप 01, मनसे 01, बविआ 03, एमआयएम 02, प्रहार जनशक्ती 02, इतर 03

  शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे. तब्बल ४६ आमदार शिंदेंनी आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आज राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर एकनाथ शिंदे संतापले, दिले थेट आव्हान

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. हीच बैठक आज अखेरची बैठक असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी माहिती देणार आहे. त्यानंतर ते आपला राजीनामा देणार आहे, असल्याची माहिती समोर आली आहे.

  महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने, असं म्हणत संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या अस्ताचे संकेत दिले आहे.

  तर दुसरीकडे शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या