चिपळूण, 17 ऑक्टोबर : शिवसेनेचे (shivsena) फायरब्रँड नेते आणि आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) आणि भाजपमध्ये (bjp) रंगलेला सामना अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. आज पुन्हा एकदा भास्कर जाधव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 'गुजरात दंगलीत बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackery) हे जर नरेंद्र मोदींच्या मागे उभे राहिले नसते तर मोदींचं अस्तित्व केव्हाच संपलं असतं' अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
चिपळूणमधील सावर्डे विभागात शिवसेनाचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आज भाजपवर घणाघाती टीका केली.
हल्ली भाजप वारंवार मोदींच्या जीवावर शिवसेना निवडून आली असे म्हणते, पण भाजपने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ज्यावेळी भाजपने शिवसेनेसोबत युती केली त्यावेळी केवळ सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो होता. आज जे मोदीसाहेब पंतप्रधान म्हणून देश चालवत आहेत. त्या नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी गुजरात दंगल (gujarat riots) प्रकरणात बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेतृत्व उभं राहिलं. नाहीतर मोदींचं अस्तित्व केव्हाच संपलं असतं याचं भान भाजपने ठेवायला हवं, असा टोलाही जाधव यांनी भाजपला लगावला.
Bigg Boss 15: इशान-मायशाचे 'ते' चाळे पाहून भडकला सलमान; सुनावले खडेबोल
'शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचाही भास्कर जाधव यांनी आज समाचार घेतला. 'ज्यावेळी सरकार बनत नव्हते त्यावेळी 86 तासांचं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत सरकार कोणी बनवलं ? भाजपनेच ना? मग कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपला? तीन पायाचं सरकार म्हणून महाविकास आघाडीला हिणवणाऱ्या भाजपसोबत आज जे घटक आहेत त्यांनी भाजपचं हिंदुत्व स्वीकारलं आहे का? हे सांगावं, असा थेट सवाल जाधव यांनी फडणवीसांना विचारला.
'मुंबई महानगर पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप सूडबुद्धीने वागत असून ED, NCB, CBI, इन्कम टॅक्स अश्या केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा आरोपही यावेळी भास्कर जाधव यांनी लगावला आहे, भाजप सोडून सगळे लोक भ्रष्टाचार करतात का? असा सवाल करत सध्या मराठी माणसाला संपवण्याचं षडयंत्र भाजप करत असल्याचा आरोपही त्यांनी लगावला आहे.
दोन दिवसांपूर्वी IPL Final खेळला, आता T20 World Cup च्या सामन्यासाठी मैदानात!
'दसरा मेळाव्यातील भाषण ऐकल्यानंतर भाजपची काही मंडळी बडबडू लागली आहेत, त्यांच्या या वळवळण्यामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील सत्य असून त्या भाषणाचे वळ विरोधकांच्या पाठीवर उठले आहेत आणि म्हणून बेतालपणे वक्तव्य सुरू आहे, असा टोलाही जाधव यांनी लगावला.
'काँग्रेसने गेली सत्तर वर्षे राज्य केलं, पण आजवर त्यांनी सेनाभवनवर कधीही टीका केली नाही. मात्र जी भाजप शिवसेनेचं बोट धरून केवळ राज्यात नाही तर देशात वाढली तीच भाजप आता सेनाभवन तोडण्याची भाषा करू लागली आहे, असं म्हणत भास्कर जाधव यांनी भाजपवर टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.