गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोंच्या ताफ्यावर माओवाद्यांचा भ्याड हल्ला, 15 पोलीस शहीद

महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात 16 जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 03:44 PM IST

गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोंच्या ताफ्यावर माओवाद्यांचा भ्याड हल्ला, 15 पोलीस शहीद

प्रवीण मुधोळकर,गडचिरोली, 1 मे : महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात 15 जवान आणि एक चालक शहीद झाले. माओवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूरखेडा गावाजवळील ही घटना आहे.


कुरखेडा तालुक्यात जांभूरखेडा गावाजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'नेटवर्क 18 लोकमत'शी संवाद साधताना दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या माहितीला दुजोरा दिला आहे. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.








गस्तीवरील जवानांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या या माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटाचं लक्ष्य ठरल्या. त्यातून 25 जवान प्रवास करत होते. त्यातल्या 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि इतर जखमी आहेत.

वाचा : महाराष्ट्रादिनीच माओवाद्यांकडून जळीतकांड, 5 कोटींपेक्षा जास्त मालमत्तेचं नुकसान

या हल्ल्यापूर्वी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दानापूरमध्ये माओवाद्यांनी तब्बल 30 वाहने जाळली. या घटनेत 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त अधिक मालमत्तेचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. माओवाद्यांनी मंगळवारी(30 एप्रिल) रात्री 11 ते 3 वाजण्याच्या सुमारास हे जळीतकांड घडवून आणलं आहे.पुराडा पोलीस स्थानकाअंतर्गत येत असलेल्या दादापूर येथून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होतं. या कामावरील ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर यांसह 30 पेक्षा जास्त वाहनं जाळण्यात आली आहेत. तसंच दादापूर येथील डांबर प्लांट, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालयही माओवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आलं. माओवाद्यांनी केलेल्या या कृत्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याआधीही माओवाद्यांनी रस्ते तयार करणाऱ्या वाहनांना लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आगामी काळात अशी विकासकामं करताना माओवाद्यांकडून होणाऱ्या हिंसक प्रकारांना कसं रोखायचं, याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

VIDEO: मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, भाजप नगरसेवकावर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 01:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...